दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :76वा प्रजासत्ताक दिन ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामनाथ खाटीक ,तर मा.सरपंच दत्तात्रय खाटीक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्च 2024 मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु.अनुराधा थोरे,द्वितीय क्रमांक कु. सृष्टी सुरेश खाटीक, तृतीय क्रमांक कु.भक्ती साळूंके,कु.अक्षता वसंत खाटीक, कु.वैष्णवी गवळी यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोख स्वरुपात पारितोषिक प्रा.दिपक खाटीक यांच्या कडून देण्यात आले.यावेळी गणित विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार्या विद्यार्थी ना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी गीत गायन, लिंबूचमचा स्पर्धा, कथाकथन ,धावणे,देशभक्त पर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
प्रास्ताविक अध्यापक चंद्रकांत कचरे ,सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा अध्यापक सुनिल पंडित यांनी केले.यावेळी अड.आर.के. पाटील, मुख्याध्यापक रमेश खाटीक,मा.चेअरमन विक्रम थोरे,मा.सरपंच हरिभाऊ थोरे,मा.चेअरमन अर्जुन खाटीक, सचिव पाथरवाला सोसायटीचे पंडितराव खाटीक , संभाजी थोरे,नरेंद्र खाटीक, संदिप लिपने ,मा.चेअरमन साहेबराव खाटीक, मा.चेअरमन सुरेश खाटीक, यांच्या सह ग्रामस्थ, युवक,पालक उपस्थित होते.
पाथरवाला ग्रामपंचायत कार्यालय वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बद्रीनाथ खाटीक, होते,अमोल साहेबराव खाटीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पाथरवाला विविध कार्यकारीसेवा सहकारी सोसायटीचे ध्वजारोहण श्री निवास आनंदराव फोपसे यांच्या अध्यक्षतेखाली , संचालक संतोषकुमार बबनराव खाटीक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन प्रमोद रामनाथ खाटीक, व्हा.चेअरमन नानासाहेब गंगानगर खाटीक यांच्या सह संचालक, सभासद, कर्मचारी ,ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.