26.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

**जबरी चोरी करणारा चोर दोन तासात जेरबंद* *नेवासा पोलीसांची कामगिरी

 

 

*नेवासा पोलीसांनी जबरी चोरी करणाऱ्या चोरास शिताफीने पकडले*
दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी :- नेवासा पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्यास दोन तासात सिताफिने पकडून जेरबंद केले आहे.

दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी अथर्व प्रवीण शिरभाते रा. पंचवटी, नाशिक हा त्याच्या मामास जमीन घ्यायची असल्याने मामास जमीन पाहण्यासाठी नेवासा येथे आला होता. नेवासा ते नारायणवाडी रोड लगत असणारी शेत जमीन पाहण्यासाठी पायी जात असताना मारुती नगरकडे जाणाऱ्या रोडवर होंडा कंपनीच्या एका एचएफ डीलक्सवर मोटर सायकलवर बसून अचानक तीन अनोळखी ईसम जवळ आले व इथे काय करतो असे दरडावून विचारुन त्यातील एका ईसमाने फिर्यादी अथर्व शिरभाते यांना चाकू दाखवून गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन व हातातील प्रत्येकी दीड तोळ्याच्या सोन्याच्या तिन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला होता.

या बाबतची फिर्याद अथर्व शिरभाते यांनी नेवासा पोलीस ठाणे येथे दिली होती. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव फौजफाट्यानिशी तातडीने घटनास्थळावर दाखल झाले होते. फिर्यादीकडून घटनेची माहिती घेतली, घटनास्थळाच्या आजूबाजूची पाहणी करून फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपींची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील व नेवासा शहरातील सीसीटीव्ही फुटेजची युद्ध पातळीवर बारकाईने तपासणी केली असता नेवासा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मलिंगा उर्फ आकाश जगधने व त्याच्या सोबत आणखी दोन अनोळखी तरुण असल्याचे दिसून आले

. त्या दृष्टीने पोलिसांनी मलिंगा व त्याच्या मित्रांना पकडण्यासाठी तीन पोलीस तपास पथके तयार करून लपण्याच्या ठिकाणावर शिघ्रगतीने छापे घातले असता सतीश ईरले वय 28 वर्ष रा. लक्ष्मीनगर नेवासा यास पाठलाग करून सीताफिने पकडले परंतु मलिंगा जगधने व साथीदार मुसा बागवान बातमी परागंधा होण्यास यशस्वी झाला. यास घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस नकार दिला, परंतु पोलीसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यास सदर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात येऊन मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने 3 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला. पोलीस कस्टडी दरम्यान अटक आरोपीने जबरीने चोरून नेलेल्या दागिन्या पैकी दिड तोळ्याचे लॉकेट प्रवरा संगम येथील सराफास विकले होते ते गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगार मलिंगा जगधने याचा नेवासा पोलीस कसुन शोध घेत असून त्यास लवकरच जेरबंद करू असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अहिरे, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, अवि वैद्य, आप्पा वैद्य, आप्पा तांबे, समीर शेख, नारायण डमाळे, अमोल साळवे, गणेश जाधव यांनी अचूकपणे शिघ्रगतीने केली.

Related Articles

ताज्या बातम्या