दै.नगरशाही नेवासा तालुका प्रतिनिधी/समीर शेख
महाराष्ट्र आष्टेडू आखाडा असोसिएशन अंतर्गत आयोजित अहमदनगर जिल्हा आष्टेडू आखाडा स्पर्धा -२०२४-२५ दिनांक १८व १९जानेवारी२०२५ श्रीदत्त मंदिर देवगड,नेवासा,जिल्हा-अहमदनगर येथे नुकत्याच पार पडल्या.सदर स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित तेलकुडगाव येथील घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नेहमीप्रमाणे उत्तुंग यश मिळवले.
सदर स्पर्धेमध्ये १४वर्षे वयोगटात हस्तकला स्पर्धेमध्ये जयदीप शिंदे याने गोल्ड मेडल तसेच १७वर्षे वयोगटात मध्ये करण खोमणे,आदित्य घिगे व पार्थ घोरपडे यांनी गोल्ड मेडल पटकावले तसेच शिव कलेमध्ये गौरव तांगडे याने गोल्ड मेडल, पदसंतुलन स्पर्धेमध्ये आदित्य वजीर याने गोल्ड मेडल पटकावलं तर १९वर्ष वयोगटात हस्तकलेमध्ये ओम डांगे याने गोल्ड मेडल प्राप्त केले.
मुलींनीही उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत यश मिळवले.१४ वर्ष वयोगटात हस्तकलेमध्ये कु.श्रद्धा साखरे हिने गोल्ड मेडल पटकावले.१७ वर्षभर गटामध्ये कु.आर्य वाघमारे हिने गोल्ड मेडल पटकावले तर १७ वर्ष वयोगटामध्ये पदसंतुलन स्पर्धेमध्ये कु.विद्या आरगडे, कु.फिरदौस शेख यांनी गोल्ड मेडल तर १९ वर्ष वयोगटामध्ये हस्तकला स्पर्धेमध्ये कु.आरती गागरे हिने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर गोल्ड मेडल पटकवले,तिची नागपूर येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली.
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना मास्टर अनिल मिसाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी खेळाडूंचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील,अध्यक्षा सुमतीताई घाडगे, उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण,सचिव मनिष घाडगे,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे व प्रशासक मनिषा राऊत यांनी अभिनंदन केले.