दै.नगरशाही भेंडा प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील*जिजामाता पब्लिक स्कूल चा चित्रकलेचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 100% लागला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र गवळी यांनी दिली.*
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यामध्ये एलिमेंट्री व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला परीक्षा सन 2024 मध्ये घेण्यात आल्या. यातील इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत जिजामाता पब्लिक स्कूल, भेंडा ता. नेवासा जि. अ.नगर ने घवघवीत यश संपादन केले आहे. इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत विद्यालयातून 53 विद्यार्थी बसले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
‘अ’ श्रेणीत – 05, ‘ब’ श्रेणीत- 15 व ‘क’ श्रेणीत 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
‘अ’श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी-
कु.ओवी प्रताप खरड
कु.तेजस्वीनी संपत माळी
कु.रितिका बाबासाहेब म्हस्के
कु.श्रावणी अभिषेक मोटे व
चि.कृष्णा शिवम शेळके
या यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक प्रियंका लांडे वायकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ. चंद्रशेखरजी घुले पाटील,
मा.डॉ. क्षितीज घुले पाटील ,
विश्वस्त मा.आ.पांडुरंग अभंग, ॲड.देसाई देशमुख, सचिव अनिल शेवाळे, रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे, प्रा.डॉ. राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दीपक राऊत, शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ, मित्रपरिवार व विद्यार्थी यांमधून अभिनंदन होत आहे.