एम आय डी सी प्रश्नाविषयीं आयुक्ताना दिले निवेदन…
(नेवासा प्रतिनिधी )- पांढरीपूल एमआईडीसीतील कामगाराच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारणार असे सुतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कामगार विभागाचे संभाजी माळवदे यांनी केले. याबाबत अहिल्यानगर येथे कामगार आयुक्त याना भेटून निवेदन देण्यात आले .
नेवासा तालुक्यातील पांढरी पूल एमआईडीसी सुरु होऊन दहा वर्ष उलटून गेली या ठिकाणी अनेक नवीन उद्योग आले. परंतु स्थानिक तरुणांना या उद्योगात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयश आले. स्थानिक तरुणांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे होते परंतु तसी संधी देण्यात आली नाही. तसेच येथील अनेक उद्योगात कामगाराशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यात कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनिवर आला आहे. कामगारांना सुरक्षा कपडे, बूट, हॉस्पिटल, मेडिकल, ट्रान्सपोर्ट या प्रश्नावर सर्वच कंपन्याचा हलगर्जीपणा उघड झाला आहे याशिवाय बेसिक पेमेंट, मिनिमम वेजेस, याबाबतीत देखील कामगारावर अन्याय झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतीत कामगार शिष्टमंडळाने माळवदे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या याची दखल घेत आज अहिल्यानगर येथे कामगार आयुक्त यांची भेट घेत कामगारांच्या विविध प्रश्नावर, तसेच स्थानिक तरुणांना प्रथम प्राधान्य देत येथील उद्योगात रोजगार देण्यात यावा याविषयीं चर्चा करण्यात आली. यावेळी कामगार आयुक्त यांना विविध प्रश्नाविषयीं लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कामगार विभागाचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी पांढरीपूल एमआईडीसी मधील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असून कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट करत कामगार प्रश्नाबाबत लवकरच कंपनी प्रशासनाशी बैठक आयोजित करण्याची मागणी कामगार आयक्त यांच्याकडे केली.
तर लवकरात लवकर बैठक आयोजित करून कामगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील असे आयुक्त यांनी स्पष्ट केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे, नेवासा काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, आदी उपस्थित होते.