प्रतिनिधी
————
नेवासा : गणित विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक ,डॉक्टर, इंजिनिअर तयार होऊन ,भारत देश जागतिक महासत्ता व्हावे, असा आशावाद नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी व्यक्त केला. 52 व्या गणित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजे संभाजी माध्यमिक विद्यालय, कौठा ता.नेवासा येथे ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजा शिवछत्रपती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामदास गोल्हार होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, किसान मोर्चा अध्यक्ष अंकुश काळे, मुख्याध्यापक उद्धवराव सोनवणे, कौठ्याचे सरपंच प्रमोद गजभार, उपसरपंच कडूभाऊ मोहिते ,चेअरमन रावसाहेब शेळके,तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब काळे, जलभूमीचे संपादक बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष प्रशांत गोल्हार, डॉ.बाळासाहेब कोलते , विज्ञान अध्यक्ष तुकाराम फटांगरे, गणित अध्यक्ष संजय काळे, मार्गदर्शक सचिन कर्डीले, परीक्षा प्रमुख प्रकाश बोरुडे, परीक्षा प्रमुख महेश देशमुख, दै.नगरशाही संपादक सचिव ईस्माइल शेख,केंद्र प्रमुख नामदेव दहातोंडे, रामलाल कर्डीले, नामदेव वाघमोडे, जयंत पाटील, ज्ञानेश्वर घावटे,दत्तात्रय गवळी,चामुटे सर, कांबळे जे.एन,.भारती वाकचौरे,दिपक राऊत,अंबादास मिसाळ, सुधाकर आवारे,भाऊसाहेब जाधव, राहुल शिरसाठ, गहिले सर,तृप्ती वाघ,निर्मला धुमाळ,बापू काळे, माधवी जोशी,विजय दानवे,अशोक गायकवाड यांच्या सह नेवासा तालुक्यातील गणित विज्ञान संघटने चे सदस्य,सहभागी विद्यार्थी,पालक हजर होते.
कार्यक्रमाचे
स्वागत गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड केले. यावेळी जिल्हास्तरीय विज्ञान परीक्षेचे पारितोषिक वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक विज्ञान सचिव पांडुरंग बरे,तर सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र केकाण, शकुर शेख यांनी केले.