दै.नगरशाही
नेवासे शहर ता. १३
नेवासे होमगार्ड पथकात ७८ व्वा होमगार्ड दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अहमदनगर होमगार्ड जिल्हा समादेशक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे.
माजी तालुका होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे, पलटण नायक, अशोकरावं टेमकर, श्रीकांत ससे, अंशकालीन लिपिक अल्ताफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि १३रोजी शुक्रवारी होमगार्ड कार्यलयात येथे ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन नेवासे तालुका होमगार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.
होमगार्ड संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात रॅली काढून संघटने विषयी जनजागृती करण्यात आली तसेच नेवासे पोलीस स्टेशन येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. व झाडे लावण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने होमगार्ड जवान उपस्थित होते.