(नेवासा प्रतिनिधी )
नेवासा शहर तसेच परिसरातील राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची मागणी आज काँग्रेस पक्षाकडून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदणाद्वारे करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची असलेली धामधूम व यात दोन महिने गुंतून पडलेले प्रशासन ही वेळ दोन नंबर करणाऱ्यासाठी ही पर्वनीच ठरली.तर प्रशासनाचे दुर्लक्ष, दोन नंबर वाल्याशी असलेले आर्थिक हितसंबंध यामुळे नेवासा शहर व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी,मटका,गुटखा, गांजा, मावा, गावठी दारू, वेश्या व्यवसाय,गाड्यांची चोरी,अशा अवैध धंदयाचे स्तोम माजले याच धंद्याच्या वाढत्या प्रमाणामुळे तालुक्यात गुन्हेगारी,महिलांची छेडछाड, सर्वसामान्य नागरिकांना धमक्या, याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची दखल घेत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण, कुणबी महासंघाचे अनिल ताके यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच तहसीलदार संजय बिरादार यांची भेट घेऊन तालुक्यातील अवैध धंद्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच यासाठी विशेष पथक तयार करून याविरोधात मोहीम राबविण्याची मागणी केली. यावेळी नेवासा शहरातील युसूफ शेख, गुलाब पठाण, इम्रान पटेल, बहुजन मुक्ती मोर्चाचे गणपत मोरे, आदिसह नागरिक उपस्थित होते.यावेळीअवैध धंद्याना वेळीच आळा न घातल्यास लवकरच तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यावर नागरिकांसह मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.