21.8 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img

कुकाणा यात्रा काळात छेडछाड करणारे रोडरोमिओवर कडक कारवाई करणार :पो.नि.धनंजय जाधव

  •  * दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी: हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले नेवासा तालुक्यातील कुकाणा स्थित हजरत सय्यद न्यामत बाबा दर्गा उत्सव संबंधाने मंगळवारी 3 डिसेंबर रोजी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी यात्रा कमिटीची दर्गा परिसरामध्ये बैठक घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना जाधव यांनी उऊस,शांततेत ,शिस्तीचे पालन करून साजरा करावा तसेच,छेडछाड करणे, टगेगिरी करणे .कुणीही डीजे लावून ,कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
    या बैठकीमध्ये यात्रा कमिटीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख,भाऊसाहेब फोलाणे,अब्दुल हफिज शेख, बाळासाहेब कचरे, अमोल अभंग,कारभारी गोर्डे, विलास देशमुख, इस्माईल शेख, राम जाधव, दौलत देशमुख, मुजावर बालमभाई शेख, , एकनाथ कावरे, इनुस नालबंद,
  • ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आगळे,तलाठी अनंत विरकर,आरोग्य अधिकारी कैलास कानडे, विलास देशमुख,अरुण कुमार देशमुख, शाकिर इनामदार, इकबाल इनामदार, शकूर शेख, रामदास गोल्हार ,मच्छिंद्र कावरे, जावेद शेख ईत्यादी उपस्थित होते.

बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांनी मागील अनुभवावरून तक्रारी वजा सूचना मांडल्या. यामध्ये तरवडी चौकात पोलीस राऊटी उभारणे, दर्ग्याच्या पाठीमागे पोलीस पिंजरा उभा करणे, साधे वेषात पोलीस नेमणे, डीजे डॉल्बीला परवानगी देऊ नये. तमाशा कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मोटर सायकल पळवतात, हगामा बंदोबस्त इत्यादी सूचना मांडल्या.
स्थानिक यात्रा कमिटी व नागरिकांनी मांडलेल्या सर्व सूचनेवर तातडीने कारवाई कार्यवाही कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

  • उत्सव काळामध्ये कोणीही डॉल्बी लावून चादर मिरवणूक काढणार नाही .तसेच मोटर सायकलचे सायलेन्सर काढून कोणीही वाहने पळवणार नाहीत. या बाबतच्या सक्त सूचना पोलिसांना दिल्या असून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे. तसेच छेडछाड, रोमिओगिरी, टिंगल-टवाळी करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई करणारे सध्या वेषातील पथक देखील कार्यरत राहणार असल्याचे सांगितले आहे.
    बैठकीच्या वेळी कुकाणा दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस नाईक काळोखे, गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अवी वैद्य, रसाळ, फाटक, महिसमाळे इत्यादी हजर होते.

Related Articles

ताज्या बातम्या