दै.सार्वमत तालुका प्रतिनिधी/ सुखदेव फुलारी: अत्यंत खडतर आव्हाने पार करत स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इंडस्ट्रीजची उभारणी करून वरखेड परिवारातील शेतकरी बांधवांच्या सेवेत प्रमुख गळीत हंगामाचा शुभारंभ माळेवाडी दुमाला येथे मा.कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली येथे उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना चेअरमन विजयबापू शिवतारे यांनी कारखाना परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असून शेतकरी केंद्रबिंदू मानून विकासाची गंगा आपल्या दारात आणली आहे.ऊसाला योग्य भाव देऊ तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकरी बंधूना न्याय देऊ,असे आश्वासन उपस्थित ऊस उत्पादकांना दिले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मा.मंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगितले. डॉ. ममताताई शिवतारे-लांडे यांनी कारखाना उभारणी करिता घेतलेल्या कार्याचे कौतुक करून प्रथम गळीत हंगामाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी देखील ,उपस्थित शेतकरी,डॉ. ममताताई शिवतारे व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच येणार्या काळात सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मा.कृषीमंत्री दादा भुसे,चेअरमन तथा मा.मंत्री विजयबापू शिवतारे, देहू संस्थानचे ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज मोटे,नवनिर्वाचित आ.विठ्ठलराव लंघे, कार्यकारी संचालक डा.ममताताई शिवतारे,राष्ट्रवादी चे युवा नेते अब्दुल शेख,युवा उद्योजक काकासाहेब शिंदे, युवा नेतेप्रताप चिंधे, भाजपचे सचिन देसरडा,भाजपचे अंकुश काळे पाटील, पुरुषोत्तम सर्जे,प्रदीप ढोकणे,देविदास साळूंके, गणेश लंघे,राजेंद्र पा. काळे (जनरल मैनेजर),विशाल पाटील (जन संपर्क अधिकारी), नानासाहेब पा लंघे (कोतकर अधिकारी),सचिन पा.गडाख (इलेक्ट्रीक विभाग)-सुरेश पा.सोनवणे (चीफ इंजीनीयर),मच्छिंद्र पा.सतरकर,श्रीकांत घुले,मगर साहेब, आव्हाड साहेब, बाळासाहेब पा.साबळे, योगेश पा. पोटे ,कल्याण शेळके,सूत्र संचालन मा.पंचायत समिती सदस्य संजय खरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मेनेजर राजेंद्र काळे,तर आभार विनस शिवतारे यांनी मानले.