सोनई- प्रतिनिधी संदिप दरंदले-श्रीरामपूर येथिल जाहिर सभेत उपमुख्यमंत्री अजितददा पवार बोलताना म्हणाले की नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचा ए. बी. फॉर्म आम्ही अब्दुलभैय्या शेख यांना दिला होता. नेवासा मधून अब्दुलभैय्या ला उभ केलं होत. परंतु ए. बी. फॉर्म असताना देखील माझं अब्दुलभैय्या ने ऐकलं आणि उमेदवारी मागे घेतली माझ्या शब्दावर अब्दुलभैय्या ने माघार घेतली. तिथं नेवासाचे महायुतीचे उमेदवार लंघे आहेत तिथं अब्दुलभैय्या शेख काम करतोय. श्रीरामपुर मध्ये देखील भाऊसाहेब कांबळे यांना माघार घेण्यासाठी सांगितली होती आणि लहुजी कानडे यांना श्रीरामपूर मधून महायुतीचे उमेदवार जाहिर केलें होते पण भाऊसाहेब कांबळे माघारी च्या दिवशी उपलब्ध न झाल्याने त्यांचा फॉर्म राहिला.नेवासा मधून महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंघे हेच आहे असे जाहिर केलें व जिल्हापरिषद ला त्यांना मीच अध्यक्ष केले होते हे ही यावेळी आठवन करुण दिली.
श्रीरामपूर येथे मुख्यमंत्री शिंदे यांची सभा होणार होती परंतु अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सभा घेऊ नका असे सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी श्रीरामपूरची सभा रद्द केली त्याच सभेच्या मंडपमध्ये अजितदादा पवार यांची सभा काल पार पडली यावेळी जाहिर सभेत अब्दुलभैय्या शेख यांना सन्मानाने पुढे बोलवत आभार मानत अभिनंदन केलें. अजित पवार यांनी अब्दुलभैय्यांचे कौतुक करत सांगितले की अब्दुलभैय्या ने माझे म्हणणे ऐकले आणि राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत ए.बी. फॉर्म असताना देखील उमेदवारी मागे घेतली.