सोनई प्रतिनिधि : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.मुरकुटे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उभे राहून बंडखोरी केली असल्याने त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे.भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने पत्र प्रसिद्ध करण्यात आले आले. सन 2014च्या विधानसभा निवडणुकी पूर्वी बाळासाहेब मुरकुटे यांनी काँग्रेस मधून भाजपा मध्ये प्रवेश केला होता. गेली दहा वर्ष त्यांनी भाजपा मध्ये काम केले.नेवासात पक्ष कार्यकर्त्यांना ताकत देत नसल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक पातळीवरून प्रचंड प्रमाणात विरोध झाल्याने त्यांची उमेदवारी महायुतीने कापली असल्याची चर्चा आहे.