कुकाणा येथे महायुतीचे उमदेवार विठ्ठलराव लंघे यांचा प्रचार शुभारंभ.
कुकाणा-प्रतिनिधी-काल 221 नेवासा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री शेत्र देवगड येथे जाऊन सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर कुकाणा येथे कार्यकर्ता मेळावा व महिला मेळावा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी नेवासा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीत साथ देण्याचे आवाहन केले.तसेच मला जनतेने साथ दिली तर मी माझ आयुष्य तुमच्या सेवेसाठी खर्च करेल. प्रामाणिकपणे कार्यकर्ताच्या पाठीशी उभा राहील.तालुक्यातील ऊस उत्पादकाच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करेल. यावेळी बंडखोर उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर टीका करताना लंघे म्हणाले, मताचे विभाजन करण्यासाठी त्यांना उभे केले गेले आहे पण या तालुक्यातील मतदार हुशार आहे ते महायुतीच्याच पक्ष उमेदवारवाराला मतदान करतील. ही लढाई महायुती व महाविकास आघाडी मध्येच होणार आहे असे म्हणाले. सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनोगत यावेळी झाले.
या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यामध्ये व्यासपीठावर उद्योजक प्रभाकर काका शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल भैय्या शेख,भारतीय जनता पार्टीचे विधानसभा संयोजक सचिन देसरडा,युवानेते रवीराज तुकाराम गडाख,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,जिल्हा सचिव प्रताप चिंधे, युवा नेते ऋषिकेश शेटे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे भाजप नेवासा ,मनसेचे युवानेते किरण शिंदे,शहराध्यक्ष रोहित पवार युवा नेते मनोज पारखे, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव गंगावणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार तालुका अध्यक्ष सुरेश डिके संजय पवार शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बापूसाहेब दारकुंडे राजू काका मते,भाजप वैद्यकीय सेलचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कोलते, महायुतीचे प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे तसेच व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे व त्यांचे सर्व पदाधिकारी , भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव गर्जे,विश्वासराव काळे भाजप महिला आघाडीच्या डॉ. विद्या कोलते जिल्हा परिषद सदस्य तेजश्री ताई लंघे,भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अमृता ताई नळकांडे यांच्यासहअसंख्य मान्यवर व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी तालुक्यातील महायुतीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून एकच निर्धार करण्यात आला
त्यानंतर तालुक्यातील उस्थळ चिकणी,खामगाव,भेंडा,रांजणगाव,गोपाळपूर,खडकाफाटा,गोगलगाव, गिडेगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.