सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी एकनाथ बर्वे
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी :नेवासा तालुक्यातील अग्रगण्य असणारी व आमदार शंकरराव गडाख यांच्या कुशल मार्गदर्शनाखालील गेवराई विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवा नेते योगेश लक्ष्मण कर्डीले तर व्हा.चेअरमनपदी एकनाथ भानुदास बर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे माजी चेअरमन प्रतिक अप्पासाहेब गोरे,माजी व्हा.चेअरमन बाळासाहेब दिगंबर आदमने , संचालक सुभाष शिवराम कर्डीले,बाळासाहेब विश्वनाथ कर्डीले,भागचंद केशव कर्डीले, सागर भाऊसाहेब जगताप,सौ.शशिकला धोंडीराम पाटेकर,आदि मान्यवर ,सभासद उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून योगेश नर्सिंगपूरकर ,सचिव पंडितराव खाटीक ,सहसचिव सोमनाथ पाटेकर यांनी सहकार्य केले.
नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार शंकरराव गडाख पाटील, माजी सरपंच सोपान कर्डीले ,मा.सरपंच कपूरचंद कर्डीले, राजहंस मंडलिक,बापूसाहेब गोरे, शिवाजी कर्डीले, स्वप्नील सतरकर,वैजनाथ मंडलिक,यांच्यासह सभासद ,ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. ………………………चौकट :शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन चांगला कारभार पारदर्शी करणार: चेअरमन योगेश कर्डिले