19.3 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img

नेवासा विधानसभा (221 )मतदारसंघात 24 उमेदवारांचे 31 अर्ज वैध

  • दै.नगरशाही वृत्तसेवा
    नेवासा प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीकरिता 24 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले होते. आज बुधवार दि.30 आक्टोबर 2024 रोजी छाननीमध्ये 24 उमेदवारांच्या 33 अर्जापैकी दोन अर्ज हे बाद ठरवण्यात आले आहेत. आता 24 उमेदवारांचे 31 अर्ज निवडणूकीत वैध असल्याची माहिती नेवासा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमदार शंकरराव गडाख यांनी चार अर्ज, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे तीन अर्ज, सुनिता गडाख यांचे दोन अर्ज व अन्य विठ्ठलराव लंघे (शिवसेना शिंदे गट) अब्दुल शेख (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), हरिभाऊ चक्रनारायण (बसपा), शशिकांत मतकर (रासप), तर अपक्ष म्हणून ऋषिकेश शेटे, सचिन देसरडा, आशाताई मुरकुटे, संतोष काळे, लक्ष्मण कांबळे, पोपट सरोदे, मुकुंद अभंग, रत्नमाला लंघे, अजित काळे, ज्ञानदेव पाडळे, वसंत कांगुणे, जगन्नाथ कोरडे, सचिन दरंदले, गोरक्षनाथ कापसे, शरद माघाडे, रामदास चव्हाण, रविराज गडाख यांचे वैध अर्ज वैध ठरले आहेत.

एबी फार्म नसल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे भाजप व शिवसेना पक्षाचे 2 अर्ज अवैध ठरले आहेत.

श्री. मुरकुटे यांचे प्रहार जनशक्ती पक्ष व अपक्ष असे भरलेले उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

२११ नेवासा विधानसभा मतदारसंघाची नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. संजय बिरादार सहाय्यक, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या