29.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

निवडणूक निरीक्षक अरुण कुमार यांनी केली निवडणूक कामाची पाहणी

नेवासा प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता नेवासा तालुक्यात २२१ – नेवासा (खुला ) विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील निवडणूक कार्यालयास केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुण कुमार (भा.प्र.से.) यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण विलास उंडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. संजय बिरादार यांनी कामकाजाविषयी माहिती दिली. केंद्रीय निरीक्षक यांनी नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा व घोडेगाव येथील मतदान केंद्राची पाहणी करून तेथील मतदारांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधाची माहिती दिली मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीची वेवस्था करावी, अपंगासाठी व्हीलचेयर ची वेवस्था करावी, रॅम्प, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान करण्यापूर्वी मतदान कसे करावे याबाबत सर्व माहिती द्यावी.आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.

निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी अरुण उंडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी (उप जिल्हाधिकारी भू संपादन -१४)डॉ.संजय बिरादार (तहसीलदार )बी. ऐ. कासार (कृषी विस्तार अधिकारी ), फिरोज सय्यद (मंडळ अधिकारी ), सुभाष नागपुरे (क्षेत्रीय अधिकारी ),सोपान गायकवाड (तलाठी )कामकाजाची माहिती दिली.आदी तसेच अधिकारी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. पाथकांना केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुण कुमार (भा. प्र. से.) भेट दिली
यावेळी बोलताना अरुण कुमार म्हणाले की, सर्व यंत्रणांनी सतर्कतेने काम करणे गरजेचे आहे. विशेषतः प्रचार सभा, मिरवणुका व कार्यक्रमांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर निगराणीसाठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने नोंदी घेताना व्हिडिओ शुटींग करावी. कुठल्याही पथकाच्या माध्यमातून अथवा चेकपोस्टवर कारवाई करताना, तपासणी तसेच कारवाई करताना निवडणूक आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे फलनिष्पत्तीवर भर देण्यात यावा. निवडणूकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक अर्थविषयक बाबींवर अत्यंत सुक्ष्मपणे लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे सांगून भारत निवडणूक आयोगाच्या सुचने नुसार. कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुण कुमार (भा.प्र.से.) यांनी नेवासा विधानसभा निवडणूक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या