- नेवाशात पुन्हा एकदा शंकरराव गडाख विरुद्ध विठ्ठलराव लंघे असा सामना रंगणार!
दै.नगरशाही सोनई-संदिप दरंदले-काल रात्री उशिरा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षा कडून नेवासाची उमेदवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांना जाहीर झाली.नेवासाची जागा ही भाजपाला होती पण जागा वाटपा मध्ये ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली आहे. यामुळे नेवासा मधून उमेदवारी मिळण्यासाठी भाजपा मधील इच्छुकाचा हिरमोड झाला आहे.
नेवासात भाजपा कडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व पंचगंगा शुगरचे प्रभाकर शिंदे यांच्यामध्ये उमेदवारी मोठी रस्सीखेच चालू असतानाच रात्री उशिरा अचानकपणे भाजपा जिल्हाअध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नेवासा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता भाजपातील इच्छुक असलेले उमेदवार किंवा पंचगंगाचे प्रभाकर शिंदे काय खेळी करतात हे पाहणे पण उत्सुकता लागली आहेे
.नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेले विठ्ठलराव लंघे हे भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष असून नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी 2004 मध्ये नरेंद्र घुले यांचे विरुद्ध लढत दिली होती. यात त्यांचा अल्पशा आठशे मतांनी पराभव झाला होता तर 2009 मध्ये राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांचे विरुद्ध भाजपाचे तिकिटावर त्यांनी निवडणूक लढविली होती. दोन्ही वेळेस त्यांना थोड्या मताने पराभव पत्करावा लागला होता. 2009 मध्ये शंकरराव गडाख हे स्वतंत्र नेवासा मतदार संघाचे आमदार झाल्यानंतर लंघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले होते. परंतु 2019 विधानसभाला त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून जिल्ह्यामध्ये ते परिचित आहेत.नेवासा मतदार संघात विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी देण्याबाबत त्यांना प्रवराची निष्ठा कामाला आल्याचे बोलले जाते. यामुळे त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दिल्याची चर्चा नेवासा तालुक्यात रंगली आहे.










