जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी उपकेंद्रात घेतला प्रगतीचा आढावा !
शिरूर कासार(प्रशांत बाफना) : तालुक्यातील खालापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आर्वी उपकेंद्राने तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी व वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास खाडे यांचे मार्गदर्शनाखाली बीसीजी लसिकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले या उपकेंद्रास जिल्हाक्षयरोग अधिकारी डॉ महेशकुमार माने यांनी भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला .
प्रौढामधे क्षयरोगाच्या वाढत्या आलेखाला प्रतिबंध लावण्यासाठी लहाण बाळाप्रमाणेच प्रौढांना देखिल बीसिजीचे लसिकरण हा एक प्रभावी उपाय म्हणून प्रौढ लसिकरण मोहिम आरोग्य विभागाकडून सुरू केली त्यात खालापुरी आरोग्य केंद्रांतर्गत आर्वी उपकेंद्राने लसिकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण केले ,नुकतीच जिल्हा क्षयरोग अधिकारी माने यांनी उपकेंद्रास भेट दिली .या लसिकरणामुळे रोगप्रतिकारक क्षमतेला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला .
१८ वर्षापुढील प्रौढांना खासकरून ज्यांना पूर्वी लस मिळाली नाही किंवा ज्यांच्यात क्षयरोगाच्या संसर्गाचा धोका अधिक आहे त्यांचेवर विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे . डॉ खैरे व डॉ माने यांनी लसिकरण यंत्रणा पहाणी करून विशेष कौतूक करत अडचणीबाबत चर्चा केली ,जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत या लसिकरणाचा फायदा देण्यासाठी आरोग्य विभाग परिश्रम घेत आहे .नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समश्याचे व शंका निराकरण करण्यात आले .
वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास खाडे , डॉ संजिवनी गव्हाने ,डॉ विकास लातूरकर ,प्रविण थिगळे ,संजय पाखरे ,विलास राठोड ,संजय पाखरे ,एच बी नागरगोजे ,सपना शेख आदिचा समावेश असुन ते मोहिम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत .