(शिवसेनेकडून आ.गडाख यांना भेटला ए. बी. फॉर्म ) . दै.नगरशाही
सोनई प्रतिनिधी/संदिप दरंदले- नेवासा शिवसेनेचे (उबाठा ) गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ काल सोनई येथे झालेल्या महामेळाव्याची संपूर्ण नेवासा तालुका मध्ये चर्चा झाली.सुमारे पंचवीस हजार कार्यकर्ताचा महामेळावा सोनई येथे झाला. या महामेळावाची जबाबदारी पडद्याआड पार पाडली ती नेवासाचे युवानेते उदयन शंकरराव गडाख यांनी याची चर्चा संपूर्ण नेवासा तालुक्यात रंगली होती.
काल सोनई येथील आमराई येथे मोठा कार्यकर्ताचा मेळावा झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांना शिवसेना उबाठा पक्षाकडून आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ए. बी. फॉर्म आमदार गडाख यांना देत नेवाशातून उमेदवारी दिली.मागील निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख यांनी अपक्ष निवडून येत शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला.आमदार शंकरराव गडाख यांना जलसंधारण मंत्री पद दिले गेले.यानंतर शिवसेनेत मोठं बंड झाले.अनेक आमदार बाहेर पडत भाजपा बरोबर जाऊन महायुतीचे सरकार रात्रीतून स्थापन झाले. पण आमदार शंकरराव गडाख हे उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिले. यामुळे आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासात विकासाची गंगा आणली. सरकार नसल्याने त्यांना खूप त्रास झाला निधी अडवला गेला असे त्यांनी मेळावा मध्ये सांगितले.आता शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. पण मागील निवडणुकीत लक्ष्मणाची भूमिका पार पाडलेले प्रशांतभाऊ गडाख हे आजारी असल्याने त्यांची उणीव जाणवणार आहे.पण आमदार शंकरराव गडाख यांचे चिरंजीव आणि शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे जावई असलेले युवानेते उदयन गडाख हे पायाला भिंगरी लावून आपल्या वडिलांसाठी नेवासा तालुक्यात पळत आहेत. निवडणुकीची यंत्रणा ही पडदाआड हलवून मायक्रो प्लांनिंग करत मोठी ताकत उभा करत आहेत.त्यांच्या सोनई महामेळाव्याची नियोजनाची चर्चा काल नेवासा संपूर्ण नेवासा तालुक्यात रंगली होती. उदयन गडाख यांचा अतिशय नम्र व शांत स्वभाव असून नेवासा तालुकात पाच हजार तरुणांची मोठी फळी त्यांनी उभारली आहे.या मेळाव्याचे नियोजन पाहून भविष्यात मोठी जबाबदारी युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे युवानेते उदयन गडाख यांना देतील असे तरुणाचे नियोजन त्यांनी केले होते.याची सर्वत्र चर्चा नेवासा तालुक्यात सुरु आहे.