नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे २२० के व्ही विद्युत सबस्टेशन आहे तेथून जाणाऱ्या दहिगाव ने फिडर वरील विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौंदाळा येथिल शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे याबत सरपंच शरदराव आरगडे यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले हे
निवेदनात आरगडे त्यानी म्हंटले आहे की सौंदाळा या ठिकाणी पारेषण कंपनीचे २२० केव्ही उपकेंद्र आहे. त्यामुळे सौंदाळा परिसरामध्ये पोल टॉवर यांचे खूप मोठ्या प्रमाणात जाळे झालेले आहेत. सौंदाळा हद्दीमधे २२० केव्ही सबटेशन मधून इतर ठिकाणी जाणारी किंवा येणारी विज यासाठी उभे केलेले टॉवर साठी निश्चित केलेल्या ठिकाणी शेतकर्याची कूठलीही परवानगी घेतली जात नाही त्यांना योग्य तो मोबदला दिला जात नाही. सदर बाबतीत त्यांनी विरोध केला तर त्यांचे वर पोलिसाकडून दाबाव आणला जातो गुन्हे दाखल केले जातात. तसा प्रकार संजय रामहारी ठुबे या शेतकर्याच्या बाबतीत घडला आहे.
तसेच गोवर्धन निवृत्ती आरगडे यांच्या शेतामधे यापूर्वी विजेचा फॉल्ट होऊन त्यांचे मालकीचा ऊस व जनावरांचा चारा पेटला होता. त्यांचे झालेले नुकसान बाबत कुठलीही दखल सदर कंपनीने घेतलेली नाही. परंतु दिनांक २३/१०/२०२४ बुधवार रोजी दहिगाव ने ता-शेवगाव येथिल फिडरची विज यांचेच शेतामधून गेलेली आहे. त्यावर झालेला फॉल्ट काढणे साठी आलेल्या ७ कर्मचार्यांनी त्यांच्या कांदा या पिकाच्या रोपाची मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्याचा जाब विचारला असता ७ कर्मचार्यांनी गोवर्धन निवृत्ती आरगडे, शरद गोवर्धन आरगडे, भारत गोवर्धन आरगडे यांना मारहाण करून त्यांचेवरच प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात शरद गोवर्धन आरगडे यास अटक झाली आहे. तरी त्यांचेवरील खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा.
अशा पद्धतीने गुन्हा दाखल करून महावितरण कर्मचारी त्यांचे संघटने मार्फत पोलीसावर दवाब आणून कारवाई करण्यास भाग पाडत आहे. अशा पद्धतीने शेतकर्यावर अन्याय होत असेल तर आपण स्वत: या बाबतीत लक्ष घालून शेतकर्यांना न्याय द्यावा अन्यथा सौंदाळा ग्रामस्थ सदर प्रश्नावर तीव्र आंदोलन करतील व मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील याची आपण नोंद घ्यावी.
या निवेदनाच्या प्रति मा. गृहमंत्री कार्यालय मुंबई महाराष्ट्र
मा. ऊर्जामंत्री कार्यालय मुंबई महाराष्ट्र
मा. पोलिस अधिक्षक अहिल्यानगर
मा.तहसिलदार साहेब नेवासा
मा.पोलिस निरीक्षक नेवासा पोलिस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत