- नेवासात शिवसेने कडून शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर!तर महायुतीकडून शिंदे की मुरकुटे का तिसराच?
सोनई-संदिप दरंदले-नेवासा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून आमदार शंकरराव गडाख पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली.आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची पहिली यादी आली यामध्ये माजी जलसंधारण मंत्री व नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांना उमदेवारी आज जाहीर झाली आहे. ते मागच्या वेळेस अपक्ष उभा होते तर आता शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढतील.तर महायुती कडून अनेक इच्छुक उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईकडे पक्ष प्रमुख यांच्या कडे फेऱ्या वाढल्या आहेत.भाजपा कडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठल लंघे, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाकर शिंदे व किसनराव गडाख इच्छुक आहेत.
महाविकास आघाडीचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा मतदार संघात बैठका घेऊन मतदारसंघ बांधला आहे. गुरुवारी आमदार गडाख यांचा सोनई येथे मोठा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.तर महायुतीच्या इच्छुकांनी उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी काही इच्छुक मुंबई मध्येच तळ ठोकून आहेत तर काहींनी मुंबईच्या फेऱ्या वाढवल्या आहेत अशी माहिती मिळते.दरम्यान भाजपा कडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व शिवसेने कडून पंचगंगा शुगरचे प्रभाकर शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर काही कार्यकर्ताच्या माहिती नुसार नवीन तिसराच चेहरा उमेदवार हा महायुती कडून जाहीर होऊ शकतो. नेवासा मतदार संघात महायुतीची उमेदवारी कोणाला मिळेल याचे चित्र एक दोन दिवसात स्पष्ट होईल असे समजते.