- वै.श्री बन्सी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथी सोहळयाची स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या किर्तनाने सांगता
नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज “पैस” खांब मंदिराचे निर्माते वैकुंठवाशी गुरुवर्य हभप श्री बन्सी महाराज तांबे यांच्या ३० व्या पुण्यतिथीसोहळयाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळयाची सांगता देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मंगळवारी दि.२२ ऑक्टोबर रोजी झालेल्या करण्यात आली.गुरुवर्य वै.बन्सी महाराजांचे समर्पित जीवन हे निरपेक्ष व निस्वार्थ असे होते वारकरी संप्रदायासाठी त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिराचे प्रमुख महंत वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात स्वामी प्रकाशानंदगिरीजी बाबांनी वैकुंठवाशी हभप बन्सी महाराज तांबे यांचे जीवनकार्य विषद केले.
यावेळी बोलतांना स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की ज्ञानामृत वाटण्यासाठी अगोदर भगवान विष्णूंनी सागर मंथनात मोहिनीरूप घेऊन येथे अमृताचे वाटप केले व ज्ञानामृत वाटायचे म्हणून पुन्हा ते माऊलींच्या रूपाने या भूमीवर नेवासे क्षेत्री आले व ज्ञानामृताचे वाटप केले.ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मिळालेले ज्ञानामृत सर्वांच्या उद्धाराकरिता माऊलींनी येथे वाटले. याच माऊलींच्या कर्मभूमीचे महत्व जगाला कळावे म्हणून गुरुवर्य श्री बन्सी बाबांनी स्व:तची इस्टेट विकून माऊलींच्या “पैस” खांबासाठी मंदिर येथे बांधले, माऊलींच्या चरणी आपले जीवन त्यांनी समर्पित केले त्यांचे कार्य वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या निष्काम व निस्वार्थ कार्यामुळेच आज माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन भक्तांना होत असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन आपल्या सुश्राव्य वाणीतून झालेल्या किर्तनातून विषद केले.या प्रसंगी पुण्यतिथी सोहळयात योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा देवस्थानचे मार्गदर्शक देविदास महाराज म्हस्के,अध्यक्ष पांडुरंग अभंग,विश्वस्त भिकाजी जंगले,विश्वासराव गडाख रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे,कैलास जाधव,जनसंपर्क अधिकारी भैया कावरे, डॉ.संजय सुकाळकर यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
दरवर्षी होणाऱ्या बन्सी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयातील अन्नदानासाठी खारीचा वाटा म्हणून नेवासा येथील ज्ञानेश्वरी तोंडपाठ असलेल्या माऊली भक्त हभप सौ.गायत्रीबाई वाघ यांच्या वतीने एक लाखाचा धनादेश देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्याकडे त्यांचे सुपुत्र इंजिनिअर सुनीलराव वाघ यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.स्वामी प्रकाशानंदगिरीजी बाबांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून आठ दिवस चाललेल्या पुण्यतिथी सोहळयाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.यावेळी विखोना परिवाराच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी सोहळा मार्गदर्शक वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के,पंढरीनाथ महाराज तांदळे,महंत स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज, भगवान महाराज जंगले शास्त्री,बाळकृष्ण महाराज सुडके कृष्णा महाराज हारदे,हभप मुंगसे महाराज,नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज पवार,संतोष महाराज चौधरी,बाळू महाराज कानडे, नामदेव महाराज कंधारकर, नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, अंजाबापू महाराज कर्डीले, राजाराम महाराज तुवर,योगेश महाराज पवार, हनुमान भक्त ज्योतिषशास्त्र तज्ञ हभप बाळकृष्ण महाराज कुलकर्णी,चांगदेव महाराज काळे, हभप भोगे महाराज, राजेंद्र महाराज आसने, रामनाथ महाराज राजगुरू,गणेश महाराज गायकवाड, नामदेव महाराज कंक,गणेश महाराज दरंदले,मृदुंगाचार्य नवनाथ महाराज आगळे,भगवान महाराज डीके,बदाम महाराज पठाडे,शंकर महाराज तनपुरे,संतसेवक विष्णूपंत ठोसर,उमाकांत कंक यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.