29.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धेत त्रिमूर्ती तेलकूडगावचे यश

  1.  

    दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी/समीर शेख

    कुराश असोसिएशन अहमदनगरच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धा सिद्धी बाग,ज्युदो हॉल,अहमदनगर येथे नुकत्याच पार पडल्या.सदर स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित,तेलकूडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट प्रदर्शन करत यश मिळवले.
    सदर स्पर्धेमध्ये अंडर- १४ वयोगटात कार्तिक भोजने- गोल्ड मेडल,अंडर- १७ वयोगटात करण खोमणे-सिल्व्हर मेडल,पार्थ घोरपडे- सिल्व्हर मेडल,सुमित पवार -ब्राँझ मेडल ,चैतन्य आव्हाड- ब्राँझ मेडल,तसेच अंडर -१९ वयोगटात ओम डांगे-गोल्ड मेडल प्राप्त करण्यात यशस्वी ठरले तर मुलींनी ही नेहमी प्रमाणे त्रिमूर्तीची यशस्वी परंपरा कायम ठेवत अंडर -१४ वयोगटात कु.श्रद्धा साखरे-गोल्ड मेडल,अंडर -१७ वयोगटात कु.श्रावणी अरविंद पवार- गोल्ड मेडल,कु.साक्षी तांदळे- सिल्व्हर मेडल,कु.फिरदौस महेबूब शेख- ब्राँझ मेडल,तसेच अंडर -१९ मध्ये कु.अमृता सुनिल थोरात- गोल्ड मेडल प्राप्त करण्यात यश मिळवले.
    जिल्ह्यातील सर्व यशस्वी स्पर्धकांमधून अंडर-१४ वयोगटातून कार्तिक भोजने अंडर-१९ वयोगटातून ओम डांगे तसेच अंडर-१४ वयोगटातून कु.श्रध्दा साखरे व अंडर-१७ वयोगटातून कु.श्रावणी पवार व अंडर-१९ वयोगटात कु.अमृता थोरात यांची विभागिय स्तरावर निवड झाली.
    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक साहेबरावजी घाडगे पाटील,अध्यक्षा ॲड.सौ.सुमतीताई घाडगे पाटील,उपाध्यक्षा ॲड.स्नेहल चव्हाण पाटील,सचिव मनिष घाडगे पाटील,प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक अनिल मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले होते.
    सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजक संजय धोपकर व सोनाली मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

Related Articles

ताज्या बातम्या