दै.नगरशाही
शेवगांव प्रतिनिधी– ( जयप्रकाश बागडे )
गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्स् प्रा. ली. हरिनगर, नजिक बाभुळगांव या साखर कारखान्याचा 14 वा बॉयलरअग्निप्रदिपन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक मा.श्री. पद्माकरराव मुळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक मा. रणजीतभैय्या मुळे साहेब, कारखान्याचे तांत्रिक सल्लगार एस एन थिटे यांचे उपस्थितीत बॉयलर पूजेचे यजमान सौ. व श्री. श्वेता गणेश गंगणे, उप मुख्य अभियंता यांचे शुभहस्ते 14 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दि . 11 ऑक्टोबर, 2024 रोजी नवरात्रीमधील नवमीचे शुभ मुहूर्तावर करण्यात आला आहे. कार्यक्रमास कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कामगार, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते .
या हंगामामध्ये उसाचे लागवड क्षेत्र मागील हांगमापेक्षा कमी झालेली आहे परंतु पाऊस चांगला झाल्यामुळे हेक्टरी ऊस उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. गाळप हंगाम 2024-25 करिता तोडणी वाहतूक यंत्रणा व इतर पूर्व तयारी झालेली आहे. जायकवाडी धरण 100 टक्के भरले आहे. त्याचबरोबर कारखाना कार्यक्षेत्र व संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुढील गाळप हंगाम 2025-26 करिता ऊस लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे.
यापूर्वी अतिरीक्त ऊस असलेले गाळप हंगामात गंगामाई कारखान्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे वेळेत गाळप केलेले आहे. या हंगामामध्ये कार्यक्षेत्राबाहेरील कारखाने जादा भावाचे आमिष दाखवून ऊस मिळण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु गंगामाई कारखान्याने नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी प्राधान्य दिलेले आहे.
त्यामूळे या हंगामातही आपले कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सर्वानी आपला ऊस गंगामाई कारखान्यास देऊन सहकार्य करावे. या हंगामात गंगामाई कारखाना परिसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देणास कुठेही कमी पडणार नसल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. रणजित भैय्या मुळे यांनी सांगितले.
तसेच कारखान्याचे बेणे मळ्यात सुधारित ऊस जातीचे जादा ऊस उत्पादन व लवकर परिपक्व होणारे पीडीएन-15012, पीडीएन-15006, पीडीएन-13007 व कोव्हीएसआय-18121, या ऊस जातीचे उसाची रोपे व ऊस बेणे उपलब्ध आहे. बेणे व रोप मागणी करीता कारखान्यांचे शेतकी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी व विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांनी समाधान व्यक्त केले.
शासनाचे धोरणाप्रमाणे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात दिनांक 15 नोव्हेंबर, 2024 पासून कारखाण्याचा गाळप हंगाम सुरु करण्यासाठीची परवानगी दिलेली आहे त्यामुळे आपल्या कारखान्याचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबर, 2024 पासून सुरू करण्यासाठी पुर्वतयारी झालेली असल्याचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. व्हि.एस.खेडेकर यांनी सांगितले व उपस्थित सर्वांना कारखाना व्यवस्थापनाचे वतीने विजयादशमी च्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.