दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी/परविन शेख
निवडणूक जवळ आली की स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब व पंकजाताईंच्या नावाने मताचा जोगवा मागता आणि निवडणूक संपल्यावर स्व.मुंडे यांना विसरता हे आता जनतेने ओळखले आहे. या मतलबी आमदारांना व साखर सम्राटांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे असे प्रतिपादन मा.जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी केले.
पाथर्डीच्या पूर्व भागातील खरवंडी येथे आज जनशक्तीच्यावतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण जायभाय हे होते तर कार्यक्रमासाठी शिवाजी महाराज फटाले, भारत महाराज लोंढे, भाऊसाहेब महाराज फटांगडे, जगन्नाथ गावडे, उदय बुधवंत ,रामराव गीते, माणिक गर्जे, राधाकिसन शिंदे, सुरेश कुटे, रामनाथ काकडे, प्रमोद दौंड, अशोक शिरसाट, अनिल मुंडे, अमोल खेडकर, हरिश्चंद्र व्यवहारे, सतीश आठरे, अमोल शेळके, सुदाम पवार, बाबासाहेब वाघ, प्रल्हाद कीर्तने, योग खेडकर, अमोल खेडकर, अमोल जायभाये, दत्तू केदार, मयूर जायभाय, बाळासाहेब जवरे, सोनू गायके, रावसाहेब अंधुरे, शरद दहिफळे, अशोक ढाकणे, ज्ञानेश्वर बडे, बापू माताडे, संतोष ढगे, विशाल खेडकर, रणजीत गीते, मारुती गर्जे, किसन जगताप, मेघराज दराडे, शहादेव भवरे, स्वराज अंधुरे, अवी अंदुरे, शरद वारे, विकास राठोड, धाराभाऊ जाधव, विकास जिवडे, अमन बागवान आदि यावेळी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.काकडे म्हणाले की, आमदार सध्या फक्त नारळ फोडण्यात व्यस्त आहेत, वास्तविक त्या कार्यसम्राट नाही तर कार्यशून्य कमिशन सम्राट आमदार आहेत. २०१४ सालापर्यंत या प्रस्थापित विविध पक्षात पदे भोगून दुसऱ्या पक्षात काही मलिदा मिळेना म्हणून आमचे मिळालेले तिकिटावर त्यांनी दरोडा टाकला. या तिकीट लुटणाऱ्या दरोडेखोर आमदाराने भारतीय जनता पार्टीसाठी काय योगदान दिले. १९९७ ला पहिली जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी पक्षाचे खाते खोलले, पक्ष वाढवला. मुंडे साहेबांचा दहिफळ येथे मोठा कार्यक्रम घेऊन हजारो मुस्लिम बांधवांना पक्षात आपले केले. या आमदाराने मला साध जिल्हा परिषदचे तिकीट देखील दिलं नाही. परंतु गोरगरीब जनतेने मला राजकारणात जिवंत ठेवलं व जिल्हा परिषदेला निवडून दिले. हे प्रस्थापित साखर सम्राट जसा सरडा विविध रंग बदलतो तसे पक्ष बदलतात व इमाने इतबारे काम करणारे कार्यकर्त्यांवर अन्याय करतात. आता सर्वसामान्य जनतेला मी विनंती करतो की, यांना ओळखा व आता राजकारणातून हद्दपार करा. आमचं घर गरिबांसाठी सतत खुलं असतं. मी मतदार संघात राहते, नगर पुण्याला राहून इथला कारभार पाहत नाहीत. माझ्या सभेला महिलांची प्रचंड गर्दी असते कारण मी व काकडे साहेब यांचे चारित्र्य शुद्ध आहे. आमच्यावर माझ्या आई बहिणींचा विश्वास आहे. आम्ही पाथर्डीला प्रचाराला येऊन मार खाल्लेला नाही.
मला या मतदारसंघात महत्त्वाची कामे करायचे आहेत. एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून मी वंचित ठेवणार नाही. एकही गाव अंधारात राहणार नाही, एकही गावात जायला रस्ता नाही असे ठेवणार नाही. प्रत्येक गावातील रस्ते करण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे यावेळी गोरगरिबांचा गुलाल माझ्या अंगावर पडणार आहे. जनता विरोधकांना आता धूळ चारणार आहे. तुम्ही खरवंडीकरांनी माझ्यावर विश्वास टाका असेही सौ. काकडे म्हणाल्या.
ॲड. काकडे म्हणाले की, आमचं व्यासपीठ हे गोर गरीबांचे व्यासपीठ आहे. कोणताही मोठा पुढारी आमच्याकडे नाही. ही लढाई साखर विरुद्ध भाकर अशी आहे. एकीकडे मोठ-मोठी साखर सम्राट तर दुसरीकडे गोरगरिबांसाठी लढणारे दुबळ्यांसाठी लढणारे आम्ही आहोत. तुमच्यावर तुमच्याच लुटणाऱ्या पैशाची बरसात होणार आहे परंतु जिथे पैसे संपतात तिथून सौ. हर्षदा काकडे सुरू होतात. विधानसभेसाठी माझा हा शेवटचाच प्रयत्न आहे. यांच्याविरुद्ध फक्त ठामपणे उभा राहणारा दोन्ही तालुक्यात फक्त मीच आहे. या साखर सम्राटांना काकडे नकोय. या खरवंडी परिसरामध्ये अनेक कामे, शैक्षणिक सुविधा मला द्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही हर्षदा काकडेंना यावेळी बळ द्या असेही ॲड. काकडे यावेळी म्हणाले.
यावेळी अनेक शेतकरी व युवकांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी प्रास्ताविक अनिल मुंडे यांनी तर आभार भाऊसाहेब सातपुते यांनी मानले.
चौकट :- खरवंडी परिसरातील सौ.हर्षदा काकडे यांचे सभेसाठी प्रचंड गर्दी पाहता विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यात आता निवडणुकीसाठी लोक वर्गणीही जमा व्हायला लागली आहे. श्रीकृष्ण जायभाय यांनी साठ हजार रुपयेचा निधी सौ.हर्षदा काकडे यांना यावेळी दिला.