4.3 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img

काय आहे माळशेज घाटाचं वैशिष्ट्य? तुम्हाला पण हा घाट आवडतो का?

गनला रुंजी घालणाऱ्या कड्यांवरनं कोसळणारा मुसळधार पाऊस, शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवरून हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी आणि त्यातून वळणं घेत घेत मधेच बोगद्यातुन जाणारा रस्ता हे निसर्गसौंदर्य जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर नगर-कल्याण रस्त्यावर लागणाऱ्या माळशेज घाटाला (Malshej Ghat) भेट द्यावी लागेल.

घाटाजवळच असलेल्या खुबी नावाच्या गावाजवळ पिंपळगाव धरणाचा अतिशय सुंदर जलाशय आहे.

माळशेज घाटाचे (Malshej Ghat) विशेष असे की, या घाटाचा घाटमाथ्यावरचा भाग पुणे जिल्ह्यात तर घाटाचा मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. माळशेज घाट हा पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातला एक नयनरम्य घाट आहे.

माळशेज घाट (Malshej Ghat) हे पश्चिम महाराष्ट्रातलं एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. या ठिकाणी कित्येक मोठे तलाव, धबधबे, लांबवर पसरलेल्या डोंगररांगा, हिरव्याजर्द दुर्मिळ वनस्पती, प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. माळशेज घाट (Malshej Ghat) हा गिर्यारोहण आणि ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे.

तसंच शहरातल्या कोलाहलापासून हा घाट बराच दूर आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणांहून कित्येक लोक आपला विकेंड निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याच्या उद्देशाने माळशेज घाटाला (Malshej Ghat) भेट देतात.

इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘रोहित पक्षी’, यांना इंग्रजीमध्ये फ्लेमिंगो म्हणून ओळखलं जातं. हे परदेशी पाहुणे दरवर्षी या माळशेज घाटाच्या (Malshej Ghat) जलाशयात जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत येतात. त्यावेळी इथल्या हिरव्यागार डोंगररांगा आणि अप्रतिम फ्लेमिंगो पक्षी हे माळशेज घाटाच्या (Malshej Ghat) सौंदर्यामध्ये भर टाकतात.

माळशेज हे ठिकाण मुख्य घाटाचा रस्ता असल्यामुळे एसटीच्या बऱ्याच गाड्या या घाटातून पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. तुम्ही स्वतःचं वाहन घेऊन गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडू शकते.

माळशेज घाटातल्या (Malshej Ghat) रेस्ट हाउसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळाशी घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये ससा, घोरपड, मुंगूस, बिबट्या अशा वन्य प्राण्यांचा वावर दिसून येतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडच्या डोंगरवाडी जवळच्या शेतांमध्ये साचुन राहीलेल्या पाण्यामध्ये आपलं भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर या महिन्यात येतात.

पावसाळ्याच्या दिवसांत माळशेज घाटाकडे (Malshej Ghat) जाताना दूर डावीकडे डोंगरामध्ये खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी कित्येक पर्यटक लांबवरून इथे येतात. हा धबधबा पाहण्यासाठी फक्त पावसाळ्यातच या ठिकाणाला भेट द्यावी लागते.

  • माळशेज घाटात कसं पोहोचता येतं?

पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येतं किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येतं.
तसंच ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरवरून किन्हवली सरळगाव या मार्गाने माळशेज घाटाकडे जाता येतं.

याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर भागातून येणार्‍या पर्यटकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ हाच मुख्य मार्ग आहे. मराठवाडा आणि विदर्भातले लोक याच मार्गाने माळशेज घाटात येतात.

  • माळशेज घाटातलं पक्षी निरीक्षण

इथल्या पिंपळगाव जोगा धरणामध्ये परदेशातून फ्लेमिंगो व्यतिरिक्त कित्येक स्थलांतरित पक्षी येतात.

  • माळशेज घाटाजवळ राहण्याची सोय

कल्याण माळशेज या रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सावर्णे नावाच्या गावात रस्ता संपतो. तिथे एक हॉलिडे रिसॉर्ट आणि हॉटेल आहे. इथे राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.

या हॉटेलजवळ गाडी उभी करून पुढे थिदबी गावापर्यंत ३ किलोमीटरच्या अंतरावर कच्च्या रस्त्याने चालत जावं लागतं. इथला स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत जाता येते.

Related Articles

ताज्या बातम्या