26.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

OMG सलमान खान मेकअपविना असा दिसतो? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!

भिनेता सलमान खानला आजही बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हटलं जातं. वयाच्या 58 व्या वर्षीही सलमानचं फिटनेस पाहून चाहते आश्चर्यचकीत होतात. मात्र सध्या सोशल मीडियावर काही असे फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहून सलमानचे चाहते थक्क झाले आहेत.

या फोटोंमध्ये सलमान पूर्णपणे वेगळा दिसून येतोय. त्याच्या डोक्यावर फारसे केस नाहीत. चेहऱ्यावर आणि मानेवर सुरकुत्या पहायला मिळत आहेत. इतकंच नव्हे तर फिटनेससाठी ओळखला जाणारा सलमान या फोटोंमध्ये खूपच कमजोर दिसून येतोय.

सलमानचे असे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. या व्हायरल फोटोंवर कमेंट्स करत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र या फोटोंमागचं सत्य वेगळंच आहे. एका कंटेट क्रिएटरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

संबंधित कंटेट क्रिएटरने म्हटलंय की फोटोंमध्ये दिसणारी व्यक्ती ही 75 वर्षीय सुहास जैन आहे. ते या फोटोंमध्ये सलमान खानसारखेच दिसत असल्याचं त्याने म्हटलंय. तर सलमान म्हातारा झाल्यावर असा दिसू शकतो, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

सलमानचे हे फोटो AI द्वारे तयार करण्यात आल्याचाही अंदाज काहींनी वर्तवला आहे. याआधीही अशा पद्धतीने बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल झाले आहेत. म्हातारपणी बॉलिवूड सेलिब्रिटी कसे दिसतील, हे दाखवणारे AI फोटो व्हायरल झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या