16.1 C
New York
Monday, March 9, 2026

Buy now

spot_img

शेवगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच’ वाटप

शेवगाव प्रतिनिधी/परविन शेख

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत समुदाय गुंतवणूक निधी (CIF) वाटप आणि बँक कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे (MahaBOCW) नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ‘गृहोपयोगी वस्तू संच’ (भांडी संच) वाटप कार्यक्रम शेवगाव पाथर्डी च्या मा. आमदार मोनिका ताई राजळे यांच्या हस्ते उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळण्याबरोबरच बांधकाम क्षेत्रातील कष्टकरी कामगारांना देखील आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला बचत गट आणि कामगार बांधव हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी असे उपक्रम नेहमीच प्रेरणादायी ठरतात.

या कार्यक्रमास श्रीमती.सोनल शहा (गटविकास अधिकारी शेवगाव), श्री.रेवणनाथ भिसले (सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर), श्री.फिरोज सय्यद (तालुका अभियान व्यवस्थापक (उमेद) शेवगाव) तसेच महिला-भगिनी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या