दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी –
संत गाडगेबाबा रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी रेणुका सचिन चौधरी यांची निवड झाली असून इतर पदाधिकाऱ्यांच्याही निवडी करण्यात आल्या.
फाऊंडेशन ची बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष कारभारी गरड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत एकल महिलांच्या विविध उद्योग व्यवसाय बाबत मार्गदर्शन व सहकार्य करणे, त्यांच्या बालकांसाठी बालसंगोपन चा लाभ मिळवून देणे तसेच विविध समस्या व अडचणी बाबत सहकार्य करण्या बाबत चर्चा झाली. तसेच पुढील एक वर्षासाठी खालील प्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आली.
अध्यक्ष – रेणुका सचिन चौधरी, उपाध्यक्ष – भारत आरगडे , सचिव – कारभारी गरड , सहसचिव – येडूभाऊ सोनवणे, कोषाध्यक्ष – आप्पासाहेब वाबळे .
संत गाडगेबाबा रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन संचलित साऊ एकल महिला समिती तालुक्यातील सर्वच प्रकारच्या एकल महिलां व त्यांच्या बालकांसाठी गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे . नेवासा तालुक्यातील एकल महिलांच्या काही समस्या असतील तर त्यांनी समिती सदस्यांशी संपर्क करण्याचे आवाहन अध्यक्ष रेणुका चौधरी यांनी केले आहे.










