दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ग्रामसभेने घेतलेला “जातमुक्त” गाव ठराव हा राज्याला दिशा देऊन जाती पातीला मुठमाती देऊन माणसाला माणुस जगण्यासाठी आदर्श निर्माण करणारा आहे असे आ. विठ्ठलराव लंघे यांनी म्हंटले आहे
नेवासा पंचायत समिती येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर मध्ये मार्गदर्शन करतांना आ. लंघे बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की नेवासा तालुका स्वातंत्र्य. समता.बंधुता चा अंगीकरणारा तालुका आहे इथे सर्व अठरा पगड जाती व धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात
“आता विश्वात्मके देवे”हा संदेश नेवासा या भूमीतूनच संत ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड जगाला दिला आहे याप्रमाणे आता जाती पातीला थारा न देता मानव हाच धर्म माणुसकी हीच जात या सौंदाळा ग्रामपंचायतच्या ठरावाचा अवलंब करणे गरजेचे आहे ग्रामपंचायतच्या या ठरावाला संपुर्ण देशभर प्रसिद्धी मिळाली असुन भविष्यात सौंदाळा ग्रामपंचायत महाराष्ट्रात अव्वल दिसेल असा विश्वास व्यक्त केला
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच शरदराव आरगडे यांचा आ. लंघे यांच्या हस्ते सत्कार करुन कौतुक करण्यात आले
सौंदाळा ग्रामपंचायतने मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने मोबाईल बंदी.शिवी दिल्यास ५०० रु. दंड. विधवा महिलांना सन्मान अशा समाजहिताच्या योजना राबवल्या असुन हा आदर्श तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतने घ्यावा असेही ते म्हणाले
यावेळी तहसीलदार संजय बिरादार. पोलीस निरीक्षक महेश पाटील. गटविकास अधिकारी संजय लखवाल. अतिरिक्त गटविकास अधिकारी कासार. सरपंच शरदराव आरगडे. दिनकरराव गर्जे. प्रमोद गजभार. आदी तालुक्यातील सरपंच व सर्व विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते










