0.3 C
New York
Tuesday, March 3, 2026

Buy now

spot_img

पोलीस पुत्राचा प्रामाणिकपणा चार तोळ्याचे दागीने केले परत

भेंडा – प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वीच खरेदी केलेले चार तोळे दागिने बँकेत ठेवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून नजर चुकीने खिशात ठेवण्याऐवजी खाली पडले. ते दागीने सापडल्यानंतर पावतीवरील नाव व क्रमांकवर संपर्क साधत विनोद कमलाकर शिंदे यांनी प्रामाणिकपणे ज्याचे होते त्याच्या ताब्यात दिले.
भेंडा बुद्रुक येथील विष्णू गरड यांनी दोन दिवसांपूर्वी चार तोळ्याचे दागिने खरेदी केले होते. ते दागिने जिल्हा सहकारी बँकेच्या भेंडा शाखेत ठेवण्यासाठी ते गेले. मात्र जेवणाची सुट्टी झाल्याने ते परत बाहेर आले व खिशात दागिने ठेवले. परंतु ते खिशात न जाता बाहेरच खाली पडले.नंतर ते आपल्या दुसऱ्या कामासाठी निघून गेल्यानंतर पुन्हा बँकेत आल्यावर त्यांच्या ती बाब लक्षात आली. अनेक ठिकाणी शोधा शोध करूनही ते दागिने सापडले नाही.
बँकेत काही कामानिमित्त आलेल्या विनोद शिंदे रा.देडगाव यांना बँकेच्या आवारात समोरच छोटी पिशवी सापडली. त्यांनी उघडून पाहिले असता त्यात दागिने आढळून आले. घरी गेल्यानंतर त्यांनी तो प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. सेवानिवृत्त कमलाकर शिंदे यांनी पोलीस खात्यात आयुष्यभर नोकरी केली असल्याने ज्याचे दागीने आहेत त्यांना परत करण्याचा निर्णय घेतला.पावतीवरील क्रमांक वर संपर्क केला करून आपली ओळख पटवून देऊन आपले दागिने घेऊन जावे असे गरड यांना सांगितले.
दागिने सापडल्याचे समजतात गरड व त्यांच्या कुटुंबीयांना फार हायसे वाटले व त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
विनोद शिंदे हे मूळ पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील असून नेवासा तालुक्यातील देडगाव येथे राहतात. त्यांनी अनेक वर्ष कुकाणा येथील देवगाव चौकात चहाची टपरी चालवली आहे. मागील वर्षी अतिक्रमणात त्यांचा तो व्यवसाय बंद पडल्याने आता वेगवेगळ्या बाजारच्या दिवशी भाजीपाला विकण्याचे काम ते करतात. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे भेंडा व कुकाणा परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या