त्रिमूर्तीनगर (प्रतिनिधी) /राजेंद्र कात्रस
त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व त्रिमूर्ती फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांनी १९२८ साली लावलेल्या “रमन परिणाम” या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्या या संशोधनाबद्दल १९३० साली त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान चे सचिव श्री. मनीष घाडगे पाटील, सिनियर कॉलेजच्या समन्वयिका डॉ. अनुराधा गोरे, प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे , प्रा.समीर ठाकूर,प्रमुख व्याख्याते प्रा. नामदेव कचरे हे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. निकिता बर्गे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो जीवनशैलीचा भाग असल्याचे सांगितले.
प्रमुख व्याख्याते प्रा. नामदेव कचरे यांनी विज्ञानाची समाजातील भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवोन्मेषी विचारसरणी जोपासण्याचे मार्गदर्शन केले. “जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि सातत्य या गुणांमुळेच नवे शोध लागतात,” असे ते म्हणाले.
यावेळी कु. पूजा डोईफोडे व कु. कल्याणी वरखडे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व, रमन परिणामाची माहिती तसेच विज्ञानाच्या प्रगतीतील विद्यार्थ्यांची भूमिका यावर प्रभावी भाषण केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमासाठी प्रा. निकिता बर्गे, प्रा. सोमनाथ खेडकर, प्रा. गोरख गुंड, प्रा. संतोष जावळे, प्रा. राहुल बोरुडे, प्रा. अनिकेत आरसुळे, प्रा. अश्विनी औटी, प्रा. प्रवीण आवारे, प्रा. मंगेश वैरागर, प्रा. गायत्री ढाकिफळे, प्रा. ज्योती दहातोंडे, प्रा. स्वप्नाली दरंदले, प्रा. सागर सोलट, प्रा. साईनाथ भवर, प्रा. अक्षय देवतरसे, प्रा. योगिता गायकवाड, प्रा. भोसले, प्रा. कराडे, प्रा. वंजारे, प्रा. पल्हारे प्रा. पठाडे सरला, प्रा. अनारसे स्नेहल आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. राहुल बोरुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिषेक दरंदले यांनी केले.
या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.










