24 तासात आरोपींचा शोध घेऊन जेरबंद!
दै.नगरशाही विशेष प्रतिनिधी
नेवासा पोलीस स्टेशन
गु र नं 153/2026
कलम 304(2) BNS सदर गुन्ह्यातील फिर्यादी बबनबाई बनकर ह्या सुकळी गावच्या शिवारात, तरटी पाटावर शेळ्या चारत असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकल वरून आले व रस्ता कुठे जात आहे ? याबाबत विचारण्याचा बहाणा करून त्यांनी फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने घेऊन गेले होते.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू, पो नि महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी करून. तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
सदर गुन्ह्यात तांत्रीक तपास तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमी दारामार्फत माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा आरोपी सुदाम विक्रम जाधव याने त्याचे साथीदारासोबत केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर आरोपीस 24 तासाच्या Psi विकास पाटील, Psi ससाणे, पो शि नारायण, अतुल शेळके, पो शि गणेश जाधव, वाल्मीक वाघ, यांनी अटक केली आहे.
आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील कायदेशीर तपास चालू आहे.चोवीस तासात चोरीचा तपास पोलीस निरीक्षक मनोज पाटील व टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.










