दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कुकाणा व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कुकाणा येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने यात्रोत्सव शनिवार दि. १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रोत्सव समितीने दिली आहे.
या यात्रा उत्सवाला पाच वर्षापासून प्रारंभ करण्यात आला आहे. हा यात्रोत्सव शनिवार ते सोमवार असे तीन दिवस सुरु
रहाणार असून शनिवारी (दि. १४) पहिल्या दिवशी सायंकाळी सहा वाजता प्रवरासंगम येथून भाचिकांनी पायी आणलेल्या (गंगा जल) कावडीचे भव्य सवाद्य मिरवणुकी सोधतच हिंदू राजा बाहुबली हनुमान महाकाली अघोरी टिमचे लक्ष वेधी आकर्षण ठरणार आहे. या दरम्यान रात्री नऊ वाजता विविध रंगीबेरंगी शोभेची दारु, तोफांची सलामी व फटाक्यांची अतिषबाजी भाविकांना एक अगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे.
महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी रविवारी दि. १५ रोजी श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात
पहाटे २ वाजता रुद्राभिषेक, सकाळी ७वाजता आरती व साडे आठ वाजता श्री. क्षेत्र देवाड संस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, श्री. क्षेत्र नेवासा संत ज्ञानेश्वर संस्थानचे वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, व श्रीराम साथना आश्रमचे महंत सुनिलगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते मंदिर परिसरात ध्वजारोहन होईल. 
तर ९ ते १९ या वेळेत श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील डॉ. रविदास महाराज शिरसाठ यांचे किर्तन होईल त्यानंतर उपस्थित भाविकांना फराळाचा महाप्रसाद देण्यात येणार आहे.










