विज्ञान-गणित प्रदर्शनात तेलकुडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयाचे यश: नेवासा प्रतिनिधी/समीर शेख
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पंचायत समिती नेवासा व नेवासा तालुका विज्ञान-गणित अध्यापक संघ आयोजित ५३वे तालुकास्तरीय.. विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शन.. दिनांक ८डिसें ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत नेवासा तालुक्यातील हनुमान माध्यमिक विद्यालय,गोंडेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रदर्शनात कै.संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तेलकूडगाव येथील इयत्ता नववीच्या कॅडेट काळे वेदिका दादासाहेब व कॅडेट कदम समृध्दी शिवाजी या विद्यार्थिनींच्या गणित विषयातील-पायथागोरसचा सिद्धांत या उपकरणाला(माॅडेलला)- माध्यमिक गटात- तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
सर्व सहभागी यशस्वी विद्यार्थिनींना विषय शिक्षक किरण पाठक,आकाश शिदोरे,रेणूका काळे,महेश घाडगे,अविनाश घोडेचोर,गणेश काळे,रेखा राणे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान ज्ञानेश्वर चे संचालक,जेष्ठ नेते ,विधितज्ञ मा. देसाई आबा देशमुख,शिक्षण विस्ताराधिकारी मीरा केदार मॅडम, नेवासा तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष मा.इस्माईल शेख सर,नेवासा तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष मा.तुकाराम फटांगरे सर,शिक्षक नेते -संचालक सुनिल दानवे सर,संघटनेचे सल्लागार प्रा.सचिन कर्डिले सर समवेत जयंत पाटील सर,दत्तात्रय गवळी सर, प्रकाश बोरुडे सर,संजय काळे सर आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील,उपाध्यक्षा स्नेहल चव्हाणपाटील,सचिव मनिष घाडगेपाटील,सहसचिव डॉ.श्रुती आमलेपाटील,संस्थेचे विश्वस्त चेतन चव्हाणपाटील, विश्वस्त डाॅ.गौरव आमलेपाटील व विद्यालयाच्या प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.










