भेंडा – (प्रतिनिधी ) ‘
जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालय भेंडा येथे क्लासवन अधिकारी पूजा शिंदे तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी सातत्य आणि आई-वडिलांप्रती आदर ठेवल्यास यशाचे शिखर गाठू शकतात असे विचार पूजा शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड देसाई देशमुख हे होते. याप्रसंगी नेवासा येथील नामवंत वकील बन्सी सातपुते यांनी त्यांचा मुलगा कै अमित सातपुते यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सोहम पोतदार, दिया पोतदार, साक्षी गायकवाड, आणि ईश्वरी नजन यांना प्रत्येकी चार हजार रुपये रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून प्रामाणिक कष्ट केल्यास उच्च पदावर ते पोचू शकतात असे उदगार कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड देसाई देशमुख यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक अशोकराव मिसाळ, प्राध्यापक नारायण म्हस्के ,डॉ . शिवाजी शिंदे उपप्राचार्य – भारत वाबळे, ॲड बन्सी सातपुते, नामदेव शिंदे, किशोर मिसाळ , प्रा .सुधाकर नवथर , गोरक्षनाथ पाठक , प्रा .घनवट , अविनाश टाक , शशिकांत देशमुख , भेंडा बु ” च्या माजी सरपंच – प्रा उषाताई मिसाळ, जे . डी .काळे , प्रा .टाकळकर , महादेव बनसोडे , हेमंत कवडे , प्रा सविता नवले ,बिना पोतदार,शिवप्रसाद पोतदार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नानासाहेब खराडे यांनी केले व प्रा . नंदकिशोर मते यांनी आभार मानले.










