1 C
New York
Sunday, December 7, 2025

Buy now

spot_img

रंगनाथ पंडित यांचे निधन

कुकाणा (प्रतिनिधी ) नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, स्वागत मेन्स पार्लरचे मालक व ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते रंगनाथ गंगाराम पंडित यांचे रविवार दि.७ रोजी वृदापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. अतिशय मनमिळावू, शांत स्वभावाचे होते तर धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रभागी असायचे. कुकाणा व परिसरात ते अण्णा म्हणून सर्वांच्या परिचीत होते. नाभिक समाजाबरोबर विविध समाजा मध्ये विवाह जमवण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग होता. तर त्यांनी शंभरहून अधिक विवाह जमवले. त्यांच्या जाण्याने नाभिक समाजाचे एक आदर्श व मार्गदर्शक व्यक्तीमत्व हरपले. त्यांना दोनदा आदर्श वृत्तपत्र विक्रेते म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले होते .
त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्या सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, एक विवाहित मुलगी , नातवंडे , नातजावई असा मोठा परिवार होता. वृत्तपत्रे विक्रेते अनिल पंडित, भारत पंडित व पाथरवाला माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व पत्रकार सुनिल पंडित यांचे ते वडील होत.

Related Articles

ताज्या बातम्या