दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उप प्राचार्य प्रा. दीपक राऊत, रत्नमाला खराडे, उज्वला फटांगरे, शीला गिरीकुमार व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी दीपिका देशमुख या विद्यार्थिनीने आपले विचार व्यक्त केले. पुढे बोलताना शेजुळ म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. त्यांच्या विचाराने विद्यार्थ्यांनी ज्ञानाची भूक भागवून त्यांचे विचार अंगीकारून देश हितासाठी कार्य करावे, “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा”या वाक्यातून जीवनाचा सार कळतो. त्यांची ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्ट ही दोन पुस्तके भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि देशाचा सामाजिक रचनेवर आधारित आहे असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गिलबिले हिने केले तर सुदीप खरात यांनी आभार मानले.










