नेवासा फाटा- महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व वाशिम जिल्हा हौशी धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे सुरू असलेल्या 22 व्या राज्यस्तरीय कुमार गट धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या च्या प्रथमेश विक्रम पार्टे याने उत्कृष्ट कामगिरी करत वैयक्तिक कांस्य पदक पटकावले व सांघिक कामगिरी करत रजत पदक पटकावले.
प्रथमेश पार्टे इ.10 वी व
युवराज गुंड इ.10 वी
यांनी मोलाचे योगदान देत जिल्ह्यासाठी रजत पदक पटकावले.
वरील खेळाडूचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा ॲड . सुमती घाडगेपाटील,उपाध्यक्षा ॲड.स्नेहल चव्हाण – घाडगेपाटील ,सचिव मनिष घाडगेपाटील,सहसचिव डॉ.श्रुती आमले- घाडगेपाटील,प्राचार्य सोपान काळे,ज्येष्ठ क्रीडा शिक्षक संजयसिंह चौहान ,सैनिकी अधिकारी सुभाष धवन , त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य अरविंद देशमुख ,डॉ.अनुराधा गोरे , आरसुले सर, उपप्राचार्य शांतीलाल मेहेत्रे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांनी वरील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या
वरील सर्व खेळाडूंना विद्यालयाचे प्रशिक्षक अभिजीत दळवी,संभाजी निकाळजे,महादेव काकडे,छबुराव काळे, अशोक पानकडे, साहेबराव दाणे ,गौरव दाणे,शैलेश दाणे , नितीन चिरमाडे, समीर शेख , सर्व सैनिकी प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.










