2.1 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img

जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये २३ व्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन*

.नगरशाही भेंडा प्रतिनिधी
श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचालित जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये 23 व्या क्रीडा महोत्सवास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे सहसचिव रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गणेश आरगडे, राजेंद्र काकडे, प्रो कबड्डी स्टार खेळाडू शंकर गदाई, रघुनाथ मोरकर, दीपक वायकर , प्रवीण मांडे, प्रा.डॉ.राजेंद्र गवळी, प्रा.दीपक राऊत यावेळी उपस्थित होते. .

यावेळी अधिक माहिती देताना प्रा.दीपक राऊत म्हणाले सदर क्रीडा सप्ताहात कबड्डी, क्रिकेट ,100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर रिले, उंच उडी, थाळीफेक, भालाफेक, गोळा फेक, लिंबू चमचा, सॅक रेस, बुक बॅलन्स अशा विविध प्रकारच्या स्पर्धा पार पडणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना रवींद्र मोटे यांनी विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्तीने व सांघिक भावनांनी खेळावे व आपल्या जिद्दीच्या जोरावर यश संपादन करावे.

यावेळी शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त शंकर गदाई यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून जीवनात यश मिळवावे,खेळातून चांगले विद्यार्थी तयार होतात असेही ते म्हणाले, ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा.डॉ. राजेंद्र गवळी, प्रा. दीपक राऊत, क्रीडाशिक्षक सुदीप खरात, प्रवीण कोकरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीला गिरीकुमार यांनी केले तर रूपाली कळंबळकर यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या