2.1 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता व साहित्य पुरस्कार जाहीर…*

 

*”लोकमतचे विश्वास पाटील यांना राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार”*

नेवासा(तालुका प्रतिनिधी):–नेवासा
तालुक्यातील तरवडी येथील  सत्यशोधक दीनमित्रकार
मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे २०२५ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील
राज्यस्तरीय पत्रकारीता  व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती तरवडी यांच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. मंगळवार दि.२ डिसेंबर २०२५ रोजी स्मारक समितीच्या सभागृहात सन २०२५ च्या पुरस्कारांची  घोषणा स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,उपाध्यक्ष कॉ.बाबा आरगडे व सचिव उत्तमराव पाटील यांनी केली ते पुरस्कार असे…

*दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव
पाटील पत्रकारिता पुरस्कार-२०२५*

*विश्वास शामराव पाटील,कोल्हापूर*
(उप वृत्त संपादक,कोल्हापूर लोकमत)

*साहित्य पुरस्कार-२०२५*

रवींद्र रेखा गुरव,कोल्हापूर(कादंबरी-बे दुणे शून्य), माधव जाधव,नांदेड (कथा-आमचं मत आम्हालाच),धनाजी धोंडीराम घोरपडे,सांगली (कविता-जामिनावर सुटलेला काळा घोडा),गजानन इंदुशंकर देशमुख,अमरावती (चरित्र-सबकु सलाम बोलो), संजय बोरुडे,अहिल्यानगर(ललित गद्य-लोकधन), प्रभाकर गायकवाड,परभणी (वैचारिक-मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण), राजेंद्र सलालकर,अहिल्यानगर(समीक्षा-तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण).

*विशेष पुरस्कार:-*
सचिन वसंत पाटील,सांगली (मायबोली रंग कथांचे).

वरील ग्रंथनिवड प्रा.डॉ.सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, डॉ. महेबूब  सय्यद या निवड समितीने केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या