*जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी*
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये ‘क्रांतीसुर्य’ महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमतः प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रा.दीपक राऊत, रेखा तरटे, रुक्मिणी गाडगे व विद्यार्थी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणतात. स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच त्यांनी गुलामगिरी, सार्वजनिक सत्यार्थधर्म, शेतकऱ्यांचे आसुड, इत्यादी ग्रंथसंपदा व सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावेळी प्रवीण कोकरे या शिक्षकांने आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्राचा लेखाजोखा मांडला. विद्यार्थ्यांनी रील स्टार न होता रियल स्टार व्हावे, दुसऱ्याचे स्टेटस ठेवून स्वतःचे स्टेटस बनत नसते. त्यासाठी स्वतः झिजाव लागतं असेही त्यांनी म्हटले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यम नरोटे यांने केले तर सचिन गावडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










