भेंडा: – (प्रतिनिधी ) “हिरा झाकला तरी त्याचा प्रकाश झाकता येत नाही, कधीतरी तो चमकतोच. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून दिली तर ते हिऱ्यासारखे चमकतात. ध्येय साध्य होईपर्यंत विद्यार्थ्याने जिद्दीने व मेहनतीने लढावे.” असे प्रतिपादन मा. आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
ते जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने प्रा. पुजा शिवाजी शिंदे आणि शंकर भिमराज गदई या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त काकासाहेब शिंदे, काकासाहेब नरवडे, अशोकराव मिसाळ, पंडितराव भोसले, दादासाहेब गंडाळ, विकास नन्नवरे, डॉ. नारायण म्हस्के,सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे, डॉ. शिवाजी शिंदे, भाऊसाहेब कांगुणे, श्री. संतोष पावसेआदी उपस्थित होते.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन परिसरातून आणखी आदर्श विद्यार्थी घडतील असा आशावादही डॉ. घुले यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. पुजा शिवाजी शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून राजपत्रित अधिकारी वर्ग १ पदी निवड झाली. तसेच अर्थशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी – शंकर भिमराज गदई यांना २०२३-२४ वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशामुळे शिक्षण संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयातील विस्तारित इमारतीचे भूमिपूजन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक ज्ञानस्तंभ २०२४ – २५ चे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी प्रा. पुजा शिंदे यांनी शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला आहे आणि आम्ही गुणवंत विद्यार्थी या वटवृक्षाचे एक एक पान बनत चाललो असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले.
तर शंकर गदई याने आपले मनोगत व्यक्त करताना खेळाडूंसाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि अपार मेहनत खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग देशमुख यांनी केले. तर डॉ. काकासाहेब लांडे यांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी भीमराज गदई, सौ. सखुबाई भीमराज गदई, माजी सरपंच, सौ. वैशाली शिवाजी शिंदे, नामदेव शिंदे, भागचंद चावरे, ईश्वर पाठक, सुखदेव पवार, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्ता वाकचौरे , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. केशव चेके, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित










