(क्रीडा प्रतिनिधी नेवासा) जयपूर राजस्थान येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नेवासा फाटा येथील *साक्षी सुनील एडके* Sy.B.Sc.ची धनुर्विद्या खेळाडू हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना सांघिक कामगिरी करत रिकर्व राऊंड प्रकारात ब्राँझ मेडल वर निशाणा साधला साक्षी ही मूळची कोल्हापूर येथील असून फक्त धनुर्विद्या या क्रीडा प्रकारा करिता नेवासफाटा येथील त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नेवासा फाटा येथे वसतिगृहात राहून शिक्षण व खेळ दोन्ही चांगल्या प्रकारे करत आहे इ.12 वी मध्ये असताना साक्षी हिने इंडियन राऊंड प्रकारात वरिष्ठ गट राष्ट्रीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक देखील मिळवून दिले आहे.
वरील खेळाडूचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा ॲड . सुमतीताई घाडगे पाटील,उपाध्यक्षा ॲड.स्नेहल दीदी चव्हाण पाटील ,सचिव मनिष घाडगे पाटील,सह सचिव डॉ.श्रुतिदिदी आम्ले पाटील,प्राचार्य सोपान काळे,ज्येष्ठ क्रीडा शिक्षक संजयसिंह चौहान ,सैनिकी अधिकारी धवन सर,अरविंद देशमुख ,डॉ.अनुराधा गोरे , होन मॅडम ,आरसुले सर यांनी वरील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या.
वरील सर्व खेळाडूंना विद्यालयाचे प्रशिक्षक अभिजीत दळवी,संभाजी निकाळजे,महादेव काकडे,छबुराव काळे, अशोक पानकडे, साहेबराव दाणे ,गौरव दाणे,शैलेश दाणे , नितीन चिरमाडे, समीर शेख , सर्व सैनिकी प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.










