नेवासा प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा शाळेस भेट दिली.भेटीदरम्यान पाचवी नवोदय परीक्षा संदर्भातील मुलांची तयारी पाहून समाधान व्यक्त केले. शिक्षक घेत असलेल्या जादा सराव चाचण्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येण्यास मदत होते असे सांगितले.शाळेतील या उपक्रमाचे कौतुक केले.
इयत्ता पाचवी मिशन आरंभ सराव चाचणी- एक मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या आठ मुलांचे व शिक्षकांचेही कौतुक केले. सौंदाळा गावातील भिंतीवर मुलांसाठी स्कॉलरशिप, नवोदयचा लिहीलेलाअभ्यासक्रम तसेच रात्री सहा ते आठ मुलांना मोबाईल बंद असे उपक्रम मुलांचे भविष्य घडविण्यास मदत करतील असेही भंडारी साहेब म्हणाले . शाळेला गावाचे लाभलेले सहकार्य पाहून उपस्थित सरपंच, ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले व *भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक ही शाळा व मुलांचे शिक्षण असल्याने आपण करत असलेल्या गुंतवणुकीने आपल्या गावाचे भविष्य निश्चितच उज्वल होईल असेही सांगितले*
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली असता तेथे सर्व अभिलेखे पाहून समाधान व्यक्त केले सौंदाळा ग्रामपंचायतने समजहिताच्या उपक्रमांचे कौतुक करून महिलांना सक्षमकरणासाठी ग्रामपंचायत रोजगार उपलब्ध करण्यासाठी काम करण्याचे मार्गदर्शन करून गावाचा होत असलेला विकास पाहून पुढील चांगली कामे करण्यास शुभेच्छा दिल्या .यावेळी गटविकास अधिकारी संजय लखवाल साहेब, विस्तार अधिकारी कासार साहेब, विस्तार अधिकारी पाखरे साहेब, सरपंच शरदराव आरगडे, उपसरपंच भिवसेन गरड,केंद्रप्रमुख रवींद्र कडू, मुख्याध्यापक पोपट घुले, शिक्षक अशोक पंडित, राजेश पठारे, अनिल टेकणे,किशोर विलायते,भवानी बिरू, सुरेखा मंडलिक ,संजीवनी मुरकुटे, सचिन आरगडे,गणेश आरगडे,बाबासाहेब आरगडे, विजय गोरे उपस्थित होते












