दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी – अब्दुल शेख यांना पाठिंबा देण्यासाठी महिलांची मेळाव्यास प्रचंड गर्दी. निवडणूक लढवण्यासाठी महिलांनी एक मताने हात उंचावून अब्दुल शेख यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.
कुकाना, ता. नेवासा — कुकाना येथील साई श्रद्धा लॉन्स येथे अब्दुलभैय्या शेख यांच्या संकल्पनेतून भैय्या सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य नोकरी मेळावा, शासकीय योजनेचा मेळावा तसेच आरोग्य कार्ड वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, आणि युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या कार्यक्रमास नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री. बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष अशोकजी मोरे, कुकाना ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. लताताई अभंग, ग्रा.पं. सदस्या हकिमाबी शेख, युवा नेते मा. अमोलजी अभंग, तस्मिया शेख, विलासराव देशमुख, मकरंद राजहंस, जस्मिन शेख, यास्मिन शेख, राजेंद्र बागडे, बाबासाहेब नवथर, सतीश कावरे, आबासाहेब गर्जे, गोविंद सर, इम्तियाज शेख, अभिराज आरगडे, महेश उगले, सुशांत सोनवणे, विश्वजीत देशमुख, सचिन सरोदे, राहुल चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. नोकरी मेळाव्यासाठी देशातील नामांकित कंपन्या व त्यांचे HR प्रतिनिधी उपस्थित होते. परिसरातील सर्वसामान्य नागरिक, युवक–युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिला
. अनेक युवक–युवतींना तात्काळ रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. महिलांनीही मनमोकळेपणाने आपली मते व अपेक्षा व्यक्त केल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल भैय्या सामाजिक प्रतिष्ठान आणि तस्मिया अब्दुल भैय्या शेख यांचे विशेष योगदान लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन तस्मिया शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. समाजहिताच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असे तस्मिया शेख यांनी सांगितले.










