दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी –
श्री मारूतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ९२.७ बिग एफएम यांच्या वतीने युवा व्याख्याते मा.गणेशजी शिंदे व मुख्य संपादक मा.धनेश खत्री यांच्या हस्ते कु.ओवी प्रताप खरड, मयुरी सुभाष रिंधे, सिद्धी बाळासाहेब दसपुते, रिया रणजीत गरड, तनिष्का कृष्णा गायकवाड, प्रतिक शरद भोगे, विनीत दत्तात्रय वाघ, कृष्णा शिवम शेळके, आदित्य दत्तात्रय कदम, नितीन सुदाम आगळे, या विद्यार्थ्यांचा रविवार दि.२३ रोजी माऊली सभागृह अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना युवा व्याखाते मा.गणेशजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी संस्काराची व शिक्षणाची शिदोरी घेऊन आयुष्यात यश संपन्न करावे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले
. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील, मा.डॉ.क्षितिज घुले पाटील, मा.आ.पांडुरंग अभंग, अॅड देसाई देशमुख, सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, प्रा.डॉ.राजेंद्र गवळी, प्रा.दीपक राऊत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.










