5.1 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img

जंगी कुस्तीच्या आखाड्याने न्यामतपीर शहावली बाबा ऊरूस उत्साहात संपन्न

 

दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी -नेवासा तालुक्यातील कुकाण्याचे ग्रामदैवत हजरत सय्यद न्यामतपीर शहावली बाबा ऊरूसाची सांगता दोन दिवस जंगी कुस्तीच्या आखाड्याने झाली.

या वेळी न्यामतपीर बाबा यांच्या दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.यात्रा कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक अँड देसाईआबा देशमुख यांच्या हस्ते गंगेच्या पाण्याने मजारवर जलाभिषेक करण्यात आला.धार्मिक कार्यक्रम,संदल, कावडी, छबीना, शोभेची दारू, नारळ,पानफुल दुकाने , दोन दिवस मालती इनामदार, आविष्कार मुळे तमाशा मंडळाने प्रेक्षकांची मने जिंकली.अब्दुलभैया शेख मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.रहाट पाळणे, हिरालाल पन्नालाल,सुनामी, ब्रेक डान्स,टोराटोरा,धावती ट्रेन, लहान झोके, यांचा चिमुकल्यांनी आनंद लुटला.

यंदा भाविकांची गर्दी जास्त असल्याने उरुस शांततेत पार पडण्यासाठी शेवगावचे उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु ,नेवाशाचे कर्तव्यदक्ष अधिकारी महेश पाटील, पोलिस निरीक्षक मनोज अहिरे,पो.नाईक शहाजी आंधळे,पो.का.संतोष खंडागळे, पो.को. धायतडक हरिभाऊ पो.का.बाबासाहेब वाघमोडे, अमोल डमाळे,महिला पोलिस,राज्य राखीव दलाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यात्रा
यशस्वी पार पडण्यासाठी अध्यक्ष वसंतराव देशमुख, मुजावर चाँद शेख, बाळासाहेब कचरे, दौलत देशमुख,भाऊसाहेब फोलाणे, भारत गरड, सोमनाथ कचरे,मच्छिंद्र कावरे ,एकनाथ कावरे, विठ्ठल अभंग,कारभारी गोर्डे, राम जाधव, इस्माईल शेख, विलास देशमुख, अँड देविसिंह देशमुख,अब्दुल शेख, बाळासाहेब सरोदे, अमोल अभंग,इन्नुस नालबंद,अनिल सरोदे,अनिल गर्जे, प्रशांत देशमुख,सुनिल पंडित ,बाळासाहेब आगळे, राहुल जावळे, शिवाजी कचरे, सुनिल गोरडे,
, रज्जाक इनामदार,उत्तम देवढे, रमेश चित्ते, विराज देशमुख,प्रमोद दरंदले, इक्बाल इनामदार,अकबर तांबोळी, कालुभाई इनामदार,जुम्मा पठाण,मुसा इनामदार, गणेश मोढवे,अरूण उंडे, जावेद शेख, अशोक भूमकर, सलिम इनामदार, सचिन गोरडे, इन्नुस शेख,
यांनी प्रयत्न केले.

नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे, अँड हिंम्मतसिंह देशमुख, अंकुश काळे यांनी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या.शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे ऊरुसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

स्व.शिवाजीराव देवराव देशमुख यांच्या स्मरणार्थ जितेंद्र देशमुख यांनी नविन स्वागत कमानिचे लोकार्पण
करण्यात आले.

कावड मिरवणुकीत विशाल सरोदे यांच्या “मुलगा मुलगी एकसमान,दोघांनाही शिकवू छान !”
वाचवा,तसेच “दिवा लागतो ज्ञानाचा,विकिस होतो गावाचा ! “या सामाजिक संदेशाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

हगाम्यासाठी पंच म्हणून शिवाजी कानडे,प्रा.देविदास आंग्रख, दिगंबर रिंधे , प्रा. बाळासाहेब साबळे,प्रा.राजेंद्र ढगे,प्रा.
शकुर शेख, इन्नुस पठाण, यांनी काम पाहिले.

Related Articles

ताज्या बातम्या