यात्रा काळात डी.जे.बंदी
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी/समीर शेख
महाराष्ट्रातील सर्व धर्मांच्या साधू संतांचे विचार समाजाला योग्य दिशा देणारे असून सर्व सण उत्सव एकोप्याने साजरे करा असे आवाहन नेवासा पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.कुकाणा येथील ग्रामदैवत हजरत सय्यद न्यामतपीर शहावली दर्गाह परिसरात आयोजित यात्रा कमिटी व कुकाणा ग्रामस्थ यांच्या बैठकीत बोलत होते.

तसेच यात्रा काळात संपूर्ण डी.जे.बंदी असणार असून,नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर,कर्कश हॉर्न वाचवणे, तमाशा कलावंत यांना त्रास देणे, यात्रा काळात आनंद मेळ्यात फुकट बसणे , महिलांना त्रास देणे या गोष्टी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही उपस्थित ग्रामस्थांना केले.
यात्रा कमिटीचे वतीने अब्दुलभैय्या शेख,मा.उपसरपंच बाळासाहेब कचरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, नेवासा कृ. उ. बाजार समितीचे संचालक दौलत देशमुख, भाऊसाहेब फोलाणे, एकनाथ कावरे, कारभारी गोर्डे,बालम शेख, पत्रकार बाळासाहेब सरोदे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आगळेमच्छिंद्र कावरे,,राम जाधव,अशोक मंडलिक,कालुभाई इनामदार, इन्नुस नालबंद, गणेश मोढवे,मनोज चाबुकस्वार,चांद शेख,रसुलभाई इनामदार,शाकिर इनामदार , अरूण उंडे,अनिल सरोदे,अकबर तांबोळी,पो.नाईक शहाजी आंधळे,पो.का. बाबासाहेब वाघमोडे,पो.को.धायतडक,पो.का. भारत बोडखे., सचिन गोरडे, सुरेश कचरे,उत्तम देवढे, गुलाब सय्यद,आदिंसह स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शकुर शेख तर आभार उपसरपंच सोमनाथ कचरे यांनी केले.











