दै.नगरशाही दहिगाव प्रतिनिधी
- श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने यांचे वतीने दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऊसाची नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे संमेलन कृषी विज्ञान केंद्र दहिगाव येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर संस्थेचे जेष्ठ संचालक काकासाहेब शिंदे, दादासाहेब गंडाळ, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब मरकड, शंकर जाधव तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा शेतकरी ऊस पिकात करत असलेल्या नवनवीन प्रयोगाची माहिती तसेच उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने वापरत असलेल्या नवीन तंत्रज्ञान याविषयी चर्चा तसेच माहिती संकलना साठी आयोजित केला असल्याचे डॉ. श्यामसुंदर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना सांगितली. यावेळी उपस्थित असलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांनी स्वतः शेतात करत असलेल्या प्रयोगाचे व तंत्रज्ञानाचे माहिती इतर शेतकऱ्यांना व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना दिली. दिवसेंदिवस ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये येत असलेली उदासीनता तसेच उत्पादनात होत असलेली घट हे प्रमुख प्रश्न असताना उपस्थित प्रगतशील शेतकरी नक्की काय प्रयोग किंवा तंत्रज्ञान वापरत आहे याची कुतूहलता सर्वांनाच होती. अगदी ऊस बेणे निवड, लागवड पद्धती, पाण्याचे नियोजन, खताचे नियोजन, संजीवकांचा वापर, आच्छादनाचा वापर, सेंद्रिय पद्धतीने ऊस शेती, खोडवा ऊसाचे योग्य व्यवस्थापन इत्यादी विषयावर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली.
या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी विकास घोरपडे, आबासाहेब राऊत, दत्तात्रय शेरकर, गोवर्धन ढेसले, सतीश राजेभोसले, पुरुषोत्तम सर्जे तसेच कृषि विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे इंजिनिअर राहुल पाटील यांनी केले तर आभार सचिन बडधे यांनी मानले.










